शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

मुंबईत मान्सून दाखल, 48 तासात मुसळधारचा इशारा

By admin | Updated: June 12, 2017 13:33 IST

सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबईत आज मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून मुंबईत दाखल झाला आहे.  भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबईत आज मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली.  येत्या 48 ते 72 तासांमध्ये मुंबई शहर, उपनगर आणि  सागरी किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा इसारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उपनगरात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 
 
याशिवाय, कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. नियमित वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा जरी मान्सून कोकणासह गोव्यात दाखल झाला असला तरी गेल्या आठवड्यात तीन दिवस जोरदार कोसळल्यानं सगळीकडे पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे.
 
मान्सून अत्यंत सक्रिय असून तीन ते चार ठिकाणी जोरदार वृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर इतर ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यानं सांगितलं आहे. नैऋत्य मोसमी वारे वेगानं अरबी समुद्रात दाखल होत असल्यानं जोरदार अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच मान्सूनसाठीही अत्यंत पोषक वातावरण असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.
 
सध्याची पूरक स्थिती पाहत कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय कर्नाटकाचा अंतर्गत भाग, रायलसीमाचा आणखी काही भाग, आंध्रप्रदेश किनारपट्टी, मध्य आणि उत्तर बंगालचा उपसागर आणि त्रिपुरा, आसाम, मेघालयाचा उर्वरित भागातही पावसानं प्रवेश केला आहे.