शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून आला, पण पावसाची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 03:25 IST

वेगवान वाटचाल करत मान्सून सोमवारी मुंबईत दाखल झाला. मात्र, सोमवारची रात्र वगळता मंगळवारसह बुधवारी पावसाने कुठेच हजेरी लावली नाही. उलट मागील

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वेगवान वाटचाल करत मान्सून सोमवारी मुंबईत दाखल झाला. मात्र, सोमवारची रात्र वगळता मंगळवारसह बुधवारी पावसाने कुठेच हजेरी लावली नाही. उलट मागील दोन दिवसांपासून दाटून येत असलेल्या ढगांतून प्रखर सूर्यकिरणे डोकावत असून, उकाड्यात भर पडली आहे. परिणामी, ऐन पावसाळ्यातील वातावरणातील बदलामुळे मुंबईकर उकाड्यासह घामाच्या धारांनी हैराण झाले असून, पुढील दोन ते तीन दिवस असेच वातावरण राहील, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी नैऋत्य मोसमी पाऊस आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात, दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांत, ओडिशाच्या आणखी काही भागांत दाखल झाला आहे, तर दुसरीकडे सोमवारी मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने मात्र, दोन दिवसांपासून उघडीप घेतली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी दाटून येणाऱ्या ढगांचे प्रमाण अधिक आहे. त्यानंतर मात्र, प्रखर सूर्यप्रकाश आणि वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत असून, अशीच स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहाणार आहे.हवामान खाते काय म्हणते?मान्सून एखाद्या ठिकाणी दाखल झाला, म्हणजे संबंधित ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील, असे नसते. मान्सून दाखल झालेल्या ठिकाणी तो अ‍ॅक्टिव्ह झाल्यानंतरही अनुकूल वातावरणासाठी मान्सून प्रणाली कार्यरत राहाणे आवश्यक असते. मान्सूनमधील प्रणाली कार्यरत राहिल्यास, साहजिकच मुंबईमध्ये पावसाच्या सरी बरसतील.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर-पूर्व भारतात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.राज्याला इशारा१५ जून : मराठवाड्यात बहुतांश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल.१६-१७ जून : कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बऱ्याच व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल.१८ जून : कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल.मुंबईसाठी अंदाज१५ जून : मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाच्या काही सरी कोसळण्याची शक्यता आहे.१६ जून : शहरात व उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.