शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोवाडमध्ये सत्तांतर; वाडी पालिकेत त्रिशंकू

By admin | Updated: April 24, 2015 01:36 IST

वाडी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळू शकले नाही. तर मोवाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून लावत

गणेश खवसे वाडी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळू शकले नाही. तर मोवाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून लावत भाजपाने एकहाती सत्ता प्राप्त केली. कामठी येथील पोटनिवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचाने काँग्रेसकडून जागा हिसकावली. वाडी नगर परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिग्गजांनी प्रचाराचा धुराळा उडवित निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाने ७ जागा मिळवित दबदबा निर्माण केला. भाजपाला १०, शिवसेनेला २, बसप ७ आणि १ अपक्ष उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. काँग्रेसला १ जागा मिळविण्यात यश आले. मोवाड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला अपयश आले. येथे राष्ट्रवादीची गेल्या १० वर्षांपासून सत्ता होती. मात्र या निवडणुकीत भाजपाने कंबर कसल्याने त्यांना १७पैकी ९ जागा मिळाल्याने बहुमत प्राप्त झाले. सोबतच शिवसेनेचे २ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीला ५ तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. मोवाड येथील वॉर्ड क्र. १६मध्ये ईश्वरचिठ्ठीने राष्ट्रवादीच्या रंजना सोळंके यांना तारले.