मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख पाच दिवसांवर आली असताना राज्यात पैशांचा महापूर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने महाराष्ट्रात केलेल्या कारवाईत ११ कोटींची रोकड जप्त केली आहे. तर विना परवाना वाहतूक करणारे ७० लाखांचे मद्यही ताब्यात घेण्यात आले आहे. मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखविण्याचेही प्रकार उघड झाले आहेत.निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने महाराष्ट्रात धडक मोहीम राबविताना ११ कोटी ३६ लाख ४८ हजार ८८५ रुपये तसेच दोन लाख लिटर मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. भरारी पथरात प्राप्तीकर, सीमाशुल्क व उत्पादनशुल्क विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात पैशांचा महापूर!
By admin | Updated: October 10, 2014 05:12 IST