शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी गुजरातमधून पैसे

By admin | Updated: October 13, 2014 05:32 IST

कुठल्याही बाबतीत भाजपा उमेदवार मागे पडू नयेत, याकरिता अमित शहा यांनी १५ दिवसांपूर्वी मुंबईमधील गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची एक बैठक अहमदाबाद येथे आयोजित केली होती

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिष्ठेची केली असून, महाराष्ट्र भाजपाच्या उमेदवारांमागे आर्थिक बळ उभे करण्याचे आदेश गुजरात आणि मुंबईमधील गुजराती व्यापाऱ्यांना अमित शहा यांच्यामार्फत आल्याने गुजरातमधून महाराष्ट्राच्या निवडणुकीकरिता पैशांचा प्रचंड ओघ सुरू झाल्याची माहिती गुप्तचर खात्याच्या अहवालातून समोर आली. कुठल्याही बाबतीत भाजपा उमेदवार मागे पडू नयेत, याकरिता अमित शहा यांनी १५ दिवसांपूर्वी मुंबईमधील गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची एक बैठक अहमदाबाद येथे आयोजित केली होती. या बैठकीला गुजरातच्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. अमित शहा यांनी मुंबई आणि महाराष्ट्र जिंकण्याकरिता भाजपाच्या उमेदवारांमागे आपली शक्ती उभी करा, असे आवाहन त्यांना केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. गुजराती व्यापारी महाराष्ट्र निवडणुकीकरिता रोख पैशांची वाहतूक करण्याकरिता त्यांच्या पूर्वापार असलेल्या अंगाडीयाच्या नेटवर्कचा वापर करीत आहेत. अंगाडीयामार्फत दररोज सुमारे १०० कोटी रुपयांची रोख रक्कम गुजरातमधून महाराष्ट्रात येत असावी, असा राज्य गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. मुंबईमधील गुजराती, मारवाडी व्यापारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत पैशांची ताकद भाजपाच्या मागे उभी करीत आहेत. या निवडणुकीत शिवसेना हा क्र मांक १चा शत्रू आहे; आणि कुठल्याही परिस्थितीत भाजपा शिवसेनेच्या पुढे राहिला पाहिजे, असे निर्देश भाजपाच्या गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या नेत्यांकडून त्यांच्या समाजापर्यंत पोहोचवले गेले आहेत. (प्रतिनिधी)