शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना चिमुकलीच्या बयाणाची वाट

By admin | Updated: August 26, 2014 00:57 IST

चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील वास्तव पुढे आणण्यासाठी आता पोलिसांना पीडित चिमुकलीच्या बयाणाची वाट आहे. चिमुकली शुद्धीवर आली असली तरी ती बयाण देण्याच्या मनस्थितीत

तपासाला नवी दिशा : आरोपींच्या संख्येबाबत संभ्रमवर्धा : चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील वास्तव पुढे आणण्यासाठी आता पोलिसांना पीडित चिमुकलीच्या बयाणाची वाट आहे. चिमुकली शुद्धीवर आली असली तरी ती बयाण देण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली.चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या काकानेच तिला रुग्णालयात नेले. यामुळे नेमका आरोपी कोण, याबाबत पोलिसांची चांगलीच गफलत झाली. उल्लेखनीय म्हणजे तिचे वडील, आजी आणि आजोबाही तिच्या काकाचे नाव न घेता दुसऱ्यावरच संशय व्यक्त करीत होते. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले. सुरुवातीला ‘त्या’ वस्तीतील नागरिकही याप्रकरणाबाबत मौन बाळगून होते. अखेर वाढता दबाब लक्षात घेता तेथील नागरिकांकडूनच मुलीच्या काकाकडे संशयाची सुई वळली. मात्र आता पोलीस आपल्याला अटक करतील, ही भीती लक्षात येताच पीडितेचा काका पत्नीला घेऊन पसार झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. याप्रकरणात आरोपींची संख्या एकापेक्षा अधिक असावी, असा संशय आहे. वैद्यकीय अहवालातूनही याकडे लक्ष वेधल्या गेले आहे. मात्र ही बाब उघडकीस आणण्यासाठी पीडितेचे बयाण महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. घटनेनंतर पीडितेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे तिची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी ती बयाण देण्याच्या मनस्थितीत नाही. यामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे आता राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाच्या तपासात पुढे काय निष्पन्न होते, याकडे प्रशासन आणि सामाजिक संघटनांचेही लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)