शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीची घडी अखेर बसली!

By admin | Updated: December 8, 2015 02:33 IST

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या ८ जागांपैकी ७ जागांवर आघाडी करून लढण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सोमवारी केली.

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या ८ जागांपैकी ७ जागांवर आघाडी करून लढण्याची घोषणा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सोमवारी केली. यापैकी काँग्रेस ४ तर राष्ट्रवादी ३ जागा लढवेल. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे मुंबईतील २पैकी १ जागा लढविली जाणार नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची बैठक झाली. तीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करीत ७ जागांपैकी मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि नागपूर या ४ जागा काँग्रेसने तर सोलापूर, अहमदनगर, अकोला-बुलडाणा-वाशिम या ३ जागा राष्ट्रवादीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चारही जागांवरील उमेदवारांच्या नावाचा प्रस्ताव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या ३ जागांपैकी सोलापूरमध्ये विद्यमान आमदार दीपक साळुंखे पाटील व अहमदनगरमधून अरुणकाका जगताप यांची उमेदवारी जाहीर केली. अकोला-बुलडाणा- वाशिम या जागेची उमेदवारी सोमवारी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)मुंबईतील जागेसाठी काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी चर्चा असतानाच विद्यमान आमदार भाई जगताप यांनी अर्ज दाखल केला. उमेदवारांची अधिकृत घोषणा बाकी असली तरी जगताप यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. सेनेकडून मंत्री रामदास कदम यांनी मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल केला.