शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आई माझा गुरू, शेतात केलेल्या कष्टाचं झालं चीज - हर्षल भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 01:13 IST

आयईएस परीक्षा । भारतात प्रथम आलेल्या सोलापूरच्या हर्षलची भावना

मल्लिकार्जुन देशमुख मंगळवेढा (जि़ सोलापूर): पाच वर्षांचा असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. आईनंच सारं केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं. प्रसंगी शेतात काबाडकष्ट करताना आईच्या हातावरील फोडं़़.. आज हे सारं आठवताना डोळ्यांतील अश्रू दाटताहेत. वडिलांविना पोर म्हणून त्याचं शिक्षण अपूर्ण राहता कामा नये यासाठी तिनं घेतलेल्या कष्टाचं चिज झाल्याच्या भावना आईएस परीक्षेत भारतातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविलेल्या तांडोरसारख्या (ता. मंगळवेढा) छोट्याशा गावातल्या हर्षल भोसले यानं ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

हर्षल पाच वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. त्यानंतर आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण गव्हर्न्मेंट कॉलेज, कराड येथे पूर्ण झाल्यानंतर भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेतले, नंतर राजीनामा दिला. त्यानंतर आॅईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, पुणे येथे त्याची निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (इंजिनिअर सर्व्हिसेस) झालेल्या परीक्षेचा शुक्रवारी निकाल लागला अन् हर्षलने देशात पहिला येण्याचा मान मिळविला. ऐन दिवाळीत ही गोड बातमी समजताच शनिवारी तांडोर ग्रामस्थ व मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करुन व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायतीतर्फे हर्षलचा नागरी सत्कार करण्यात आला.मी जि.प शाळेत शिकलो. माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेत घेतले. पहिल्या प्रयत्नात इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षेत भारतात पहिला आलो. आईचे आशीर्वाद व ग्रामस्थांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे मी हे यश प्राप्त करु शकलो. - हर्षल भोसले

टॅग्स :examपरीक्षा