चाकण : तेरा वर्षांच्या मुलीचा सहा महिन्यांपासून शाळा ते घरापर्यंत पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली असून, येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब नबीसाब शेख (रा. शेवकरीवाडा, चाकण, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी शेख हा सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा शिवाजी विद्यालय ते तिच्या घरापर्यंत पाठलाग करीत असे. दिनांक १६ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास शेखने तिचा पाठलाग करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणून अश्लील शब्द वापरून दमदाटी केली. याप्रकरणी चाकण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप पुढील तपास करीत आहेत.(वार्ताहर)
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला अटक
By admin | Updated: July 20, 2016 01:02 IST