शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भर महाविद्यालयात युवतीचा विनयभंग

By admin | Updated: August 12, 2016 21:02 IST

अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीनं दाद देत नसल्याने चिडलेल्या युवकाने चक्क शुक्रवारी दयानंद महाविद्यालय गाठले

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 12-  गेल्या दोन वर्षांपासून मागे लागूनही अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीनं दाद देत नसल्याने चिडलेल्या युवकाने चक्क शुक्रवारी दयानंद महाविद्यालय गाठले आणि त्या युवतीच्या वर्गासमोर तिला पकडून तिचा विनयभंग केला. माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या आईला मारुन टाकेन आणि तुझ्याही अंगावर अ‍ॅसिड टाकेन, अशी धमकीही दिली.अमोल शिवाजी पाटोळे (वज-२०, रा. स्वामी समर्थ मठाजवळ, तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) असे त्या आरोपी युवकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या मागे अमोल दोन वर्षांपासून लागला होता. सतत तिचा पाठलाग करणे, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे आदी प्रकार अमोल करीत होता. मात्र त्याच्या कुठल्याच प्रकाराला ती दाद देत नव्हती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७ वाजता पीडित मुलगी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली. अमोलने तिचा पाठलाग सुरु केला. सकाळी ११ च्या सुमारास दयानंद महाविद्यालयातील सी-४ या वर्गासमोर येऊन त्याने तिच्या गळ्यातील ओढणी हिसकावून घेत तिचा एक हात पकडला. माझ्याशी बोल नाहीतर तुझ्या आईला मारुन टाकतो, अशी धमकी देत नाहीच बोलली तर तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून जीवे ठार मारण्याची भाषाही त्याने वापरली. पीडित मुलीने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी अमोल पाटोळे याच्यावर भादंवि कलम ३५४-ड (विनयभंग), बालकांचे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ११ (४), १२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सपोनि पाटील, बनसोडे, फौजदार राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. तपास दुय्यम पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.