सातारा : बांधकाम व्यावसायिक व उद्योजक यांच्यासह अनेक सातारकरांना खंडणीसाठी त्रास देणाऱ्या काही गुंडांना ‘मोक्का’ लावण्याबाबतची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर आज, सोमवारी सातारा जिल्ह्यातील जवळपास वीस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षक यांनी संबंधित गुंडांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे वचन दिले. ‘खंडणी बहाद्दरां’कडून होणारी छळवणूक ‘लोकमत’मधून जगासमोर येताच बिल्डर असोसिएशनच्या सदस्यांची तातडीची बैठक झाली होती. सातारा शहरातील सर्व सामाजिक व आर्थिक संघटनांना सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जवळपास पाचशे उद्योजक-व्यापारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. त्यानंतर प्रमुख मंडळींनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी याच ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हेही उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यातील गुंडांकडून होणारी छळवणूक या मंडळींनी सांगितल्यानंतर दोन्हीही अधिकारी अत्यंत गंभीर झाले. महिलांना पुढे करून विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गुंडाला ‘मोक्का’ लावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तेव्हा या मंडळींशी बोलताना पोलीस अधीक्षक देशमुख यांनी ‘खंडणीबहाद्दरांवर कठोर कारवाई करण्यासाठी खंडणीविरोधी पथक (टास्क फोर्स) स्थापण्याबाबत गांभीर्याने विचार करू,’ असे आश्वासन दिले. ‘मोका’सह ‘हद्दपार’ याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी वीस संघटनांचे पदाधिकारी तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)साताऱ्यात बांधकाम व्यावसायिक व इतरांना खंडणी मागितल्याचे, त्यासाठी धमकाविण्याचे, आर्थिक नुकसान घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भरदिवसा चेन स्नॅचिंग, महाविद्यालय परिसरात लल्लन ग्रुपचे कारनामे हे प्रकार निश्चितच सातारच्या परंपरेला शोभनीय नाही.- उदयनराजे भोसले, खासदार श्साताऱ्यातील वाढती गुन्हेगारी हा खरोखरच गंभीर प्रश्न आहे. गुंडांना पोलिसी खाक्या दाखविण्याची वेळ आली आहे. मात्र, या गुंडांना राजकीय वरदहस्त लाभत असल्याच्या आरोपात तथ्य नसून, तसे असेल तर पोलिसांनी गुंडांना पोसणाऱ्यांची नावे जाहीर करावीत.- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शांतीप्रिय साताऱ्यात प्रथमच अशी तऱ्हाबिल्डरकडून खंडणी मागण्याचे प्रकार साताऱ्यात यापूर्वी कधीच घडले नव्हते. मात्र, मागील काही दिवसांपासून शहराच्या परिघावर सुरू असलेल्या बांधकामांसाठी खंडणी उकळण्यात येत आहे. फोन करून पैशांची मागणी केली जाते. जमिनीसाठी आणि फ्लॅटसाठी खंडणीचे वेगवेगळे ‘दर’ आहेत म्हणे! खंडणीखोरांना बिल्डरने प्रतिसाद दिला नाही तर बांधकामावर जाऊन सुरक्षारक्षकाला मारहाण केली जाते. बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना तर ताजी आहे. या प्रकाराची तक्रार पोलिसांत केल्यास उलट बिल्डरलाच खोट्या गुन्ह्यांत अडकविले जाते. त्यामुळे आजवर दबून राहिलेले बिल्डर आता रिंगणात उतरले आहेत.‘लोकमत’ची जागृती अन् सातारकरांचा उठाव/ वृत्त हॅलो १ वरसाताऱ्याच्या गुंडांविरुद्ध दोन्ही राजे आक्रमक/ वृत्त पान २लोकमतचादणका
सातारच्या गुंडांसाठी ‘मोक्का’
By admin | Updated: November 3, 2014 23:29 IST