शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मोहसीन हत्या खटला सालीयन यांच्याकडे सोपवा’

By admin | Updated: July 13, 2017 04:59 IST

मोहसीन शेखची हत्या करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधातील खटल्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ रोहिणी सालियन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी

जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची फेसबुकवर बदनामी केल्याच्या आरोपावरून पुण्यातील निरपराध युवक मोहसीन शेखची हत्या करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधातील खटल्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ रोहिणी सालियन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, अशी मागणी त्याचे वडील सादीक शेख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहसचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर यांची बुधवारी भेट घेऊन ही मागणी केली आहे.राज्यभरात चर्चेला आलेल्या या खटल्यातून ज्येष्ठ वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून या खटल्यात सरकारचा कोणीही वकील नाही. त्या पार्श्वभूमीवर सादीक शेख व पुण्यातील महाराष्ट्र अ‍ॅक्शन कमिटी या संस्थेच्या शिष्टमंडळाने आज भेट घेऊन अ‍ॅड. रोहिनी सालियन यांच्या नेमणुकीची मागणी केली.छत्रपती शिवाजी महाराज यांची २ जून २०१४ रोजी बदनामी करण्यासाठी काही समाजकंटकांनी फेसबुकवर फोटो ‘अपलोड’ केले होते. या कारणावरून पुणे शहर व परिसरात दंगल उसळली होती. या वेळी हडपसर भागातील इंजिनीअर मोहसीन शेखने हे कृत्य केले,असा आरोप करीत हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक धनंजय उर्फ मनोज देसाई व अन्य कार्यकर्त्यांनी त्याची निर्घृण हत्या केली. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या खटल्यात अ‍ॅड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती.कोण आहेत सालियन?अ‍ॅड. रोहिणी सालियन या फौजदारी खटल्यातील ज्येष्ठ विधिज्ञ असून, गेल्या ३५ वर्षांहून अधिक वर्षांचा त्यांना अनुभव आहे. २००८मधील मालेगाव बॉम्बस्फोट, ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील बॉम्बस्फोट या खटल्यांत विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. साध्वी प्रज्ञासिंगविरुद्धच्या खटल्यात अधिक तीव्रपणे बाजू न मांडण्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांकडून दबाव आणण्यात आला होता, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचा निडरपणा त्यांनी दाखविला होता. समाजात द्वेष पसरवून निरपराध युवकाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची गरज आहे. त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. राज्य सरकारने तातडीने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. रोहिनी सालियन यांची किंवा अन्य ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत.- अजहर तांबोळी, सचिव, महाराष्ट्र अ‍ॅक्शन कमिटी, पुणेमोहसीन शेख हत्याकांडात विशेष सरकारी वकील नेमण्याप्रकरणी त्याचे नातेवाईक व संस्थेकडून आलेल्या मागणीबाबत शासनाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल.- सतीश माथूर, पोलीस महासंचालक