शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मोहिते-पाटलांचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: March 2, 2016 03:29 IST

अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेतील लिपिक दिनकर दगडू भोसले याच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन

सोलापूर : अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेतील लिपिक दिनकर दगडू भोसले याच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी सोमवारी फेटाळला.संचालक सुभाष रामलिंग दळवी, विजय विश्वनाथ शिंदे आणि मनोज भारत रेळेकर अशी अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या अन्य तिघांची नावे आहेत. सुमित्रा पतसंस्थेत भोसले हा लिपिक म्हणून कार्यरत होता. आरोपींनी त्याच्यावर अपहार केल्याचा ठपका ठेवत, त्याची खोमनाथ (ता. मंगळवेढा) येथील शेतजमीन, तसेच पत्नीच्या नावे असलेली खंडाळी येथील जमिनीची विक्री करून ८१ लाख रुपये पतसंस्थेत जमा करून घेतले. परंतु केवळ ४१ लाखांची पावती दिली. याशिवाय भोसले याची अकलूज येथील सुजय नगरातील वडिलोपार्जित दुमजली इमारतीची किंमत ६० ते ७० लाख रुपये असताना, ती ३ लाख ८० हजार रुपयांमध्ये विकण्यास भाग पाडले. आणखी रक्कम किती येणे आहे, त्याचा हिशोब न देता आरोपी सतत मानसिक त्रास देत होते. त्यामुळे पत्नीची पुणे येथे बदली करून घेतल्यानंतरही तिच्या नावे चेक घेऊन फौजदारी खटला दाखल करण्याची धमकी दिली. आरोपींच्या या सततच्या छळास कंटाळून दिनकर भोसले याने १२ जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विष प्राशन करून आत्महत्या केली. पत्नी कल्याणी भोसले हिने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)