शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य संचालकपदी मोहन जाधव

By admin | Updated: April 14, 2016 04:02 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या निलंबनानंतर संचालकपदाचा पदभार बुधवारी डॉ. मोहन जाधव यांच्याकडे देण्यात आला. मॅटपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक टप्प्यावर

सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई : जाधवांना न्याय मात्र मुख्यमंत्र्यांकडून मिळाला!

- अतुल कुलकर्णी,  मुंबई सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या निलंबनानंतर संचालकपदाचा पदभार बुधवारी डॉ. मोहन जाधव यांच्याकडे देण्यात आला. मॅटपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक टप्प्यावर लढाई जिंकलेल्या डॉ. जाधव यांना अखेर मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून दिला.निलंबित संचालक डॉ. सतीश पवार यांनी केवळ औषध खरेदीत मनमानी केली नाही, पण संचालकपदापर्यंत पोहोचण्यासाठी आपणच पात्र ठरले पाहिजे, अशा प्रकारे निवडीचे निकष आयत्या वेळी बदलल्याचे स्पष्ट निष्कर्ष सर्वच न्यायालयांनी काढले होते. त्यामुळे सर्व प्रक्रियेत डॉ. पवार यांच्याहून अधिक शैक्षणिक अर्हता असलेले व सेवाज्येष्ठता असूनही डॉ. जाधव डावलले गेले होते. लोकमतने औषध खरेदीचा भांडाफोड केल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला आणि त्यात डॉ. पवार यांना निलंबित करण्यात आले. त्यांचा पदभार कोणाला द्यायचा यावर विभागात मोठी खलबते झाली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सेवा ज्येष्ठतेनुसार यादी तयार करून मुख्यमंत्र्यांकडे फाइल पाठवली. त्या फायलीत डॉ. अर्चना पाटील (सतीश पवार यांच्या पत्नी), डॉ. मुकूंद डिग्गीकर, डॉ. शशिकांत जाधव, डॉ. साधना तायडे आणि कांचन जगताप यांची नावे होती. त्यात पाटील, जाधव आणि तायडे हे औषध खरेदी समितीचे सदस्य होते, त्यांचीच चौकशी आता होणार आहे; त्यामुळे ही नावे घेता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, तर डॉ. डिग्गीकर यांची दुसऱ्या एका खरेदी घोटाळ्यात विभागीय चौकशी सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर यांनी निदर्शनास आणून दिले. विभागाच्या यादीत कोठेही नाव नसलेल्या डॉ. मोहन जाधव यांच्या लढ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली आणि त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर जाधव यांच्याकडे पदभार द्यावा, असा निर्णय दिला. दरम्यान आज विधानसभेत औषध खरेदीवरुन अनेक सदस्यांनी सरकारला धारेवर धरले. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी चर्चेला उत्तर दिले.अन्यायाचा असाही शेवटविधिमंडळात औषध घोटाळ्यावरून घणाघाती भाषणे झाली, राज्याच्या आरोग्य विभागाचा प्रमुख निलंबित करण्याची वेळ आल्याने सरकारच्या प्रतिमेला तडा गेला, प्रधान सचिव भगवान सहाय यांची चौकशी समिती नेमावी लागली. त्यातून अनेक सत्ये समोर येतीलही. मात्र २००४ पासून अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या एका अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेमुळे या गदारोळातही न्याय मिळाला व मुख्यमंत्र्यांची अत्यंत संवेदनशील प्रतिमाही समोर आली.