शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे भाषण; अधिसूचनेत विसंगती

By admin | Updated: January 6, 2017 04:17 IST

३० डिसेंबरपर्यंत चलनातून रद्द झालेल्या ५०० व १०००च्या नोटा काही कारणास्तव बदलून घेता आल्या नाहीत तर त्या नोटा ३१ मार्च २०१७पर्यंत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून

मुंबई : ३० डिसेंबरपर्यंत चलनातून रद्द झालेल्या ५०० व १०००च्या नोटा काही कारणास्तव बदलून घेता आल्या नाहीत तर त्या नोटा ३१ मार्च २०१७पर्यंत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून (आरबीआय) बदलून मिळतील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या भाषणातून सामान्यांना दिले होते. मात्र सरकारने याचे भान न ठेवता ३० डिसेंबर २०१६ रोजी वटहुकुमाद्वारे ही सुविधा केवळ नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांपुरतीच मर्यादित ठेवली. सरकारने शब्द न पाळल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारचा ३० डिसेंबरचा वटहुकूम रद्द करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका काँग्रेसचे मुंबईचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.३० डिसेंबरनंतर आरबीआयने जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने बुधवारी आरबीआयच्या फोर्ट येथील मुख्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुंबईचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत परदेशी असलेल्या भारतीयांनाच जुन्या नोटा त्यांच्या बँकेत जमा करू शकण्याची सुविधा मिळेल, असे स्पष्ट करत सरकारने तसा वटहुकूम जारी केला. या वटहुकुमाला सचिन सावंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आरबीआयवर दबाव असल्यास किंवा त्यांना कोणी राजकीय नेत्याने अतिरिक्त अधिकार दिले असल्यास त्यांना स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावे, अशीही मागणी सावंत यांनी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)