शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची पहिली विजयी सभा कऱ्हाडातच घेऊ!

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

राजीवप्रताप रुडी : अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत दिले आव्हान; ‘कॉँग्रेस-राष्ट्रवादी’वर हल्लाबोल

कऱ्हाड : ‘राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यामुळे काँग्रेसला पापातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे; पण महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीला धडा शिकविल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही, म्हणूनच भाजपच्या विजयाची राज्यातील पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कऱ्हाडात घेऊ,’ असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खासदार राजीवप्रताप रुडी यांनी व्यक्त केला.येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, डॉ. अतुल भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे उमेदवार मनोज घोरपडे, ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे नेते राजाभाऊ देशपांडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जगदीश जगताप, नगरसेवक विनायक पावसकर, विक्रम पावसकर, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, विरोधी पक्षनेते महादेव पवार, धोंडिराम जाधव, विष्णू पाटसकर, नितीश देशपांडे, विकास पाटील, लक्ष्मण जगताप, जयश्री कारंडे, अप्पासाहेब माने, पैलवान आनंदराव मोहिते, नईम कागदी उपस्थित होते.खासदार रुडी म्हणाले, ‘महाराष्ट्रात तब्बल २५ वर्षांनंतर पूर्ण बहुमताने एकपक्षीय भाजप सरकार निवडण्याची संधी जनतेला उपलब्ध झाली आहे. या संधीचा जनतेने लाभ घ्यावा. काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वच पक्ष भाजपाला टीकेचे लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार सत्तेवर येणार या भीतीने त्यांच्याकडून भाजपला टार्गेट केले जात आहेत. काहीजण तर नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा का घेत आहेत? असा सवाल उपस्थित करतात. मोदींना जनतेची काळजी असल्याने ते प्रचार सभा घेत आहेत. नाहीतर यापूर्वीचे पंतप्रधान मात्र ना हालत होते, ना बोलत होते; पण आज नरेंद्र मोदी केवळ देशाचेच नव्हे, तर जागतिक स्तरावरील नेता म्हणून नावारूपाला येत आहेत. खरंतर लोकसभेला सर्वाधिक जागा मिळवून देऊन भाजप व मित्रपक्षांचे शासन केंद्रात सत्तेवर आणण्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहिले आहे. या सरकारचे नेतृत्व करणारे एक शिलेदार बनण्याची संधी डॉ. अतुल भोसले यांना द्यावी.’विनोद तावडे म्हणाले, ‘माझ्या राज्यात गुंडगिरी नाही, अशी जाहिरात करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील गृहमंत्रीच ‘आता निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा,’ असे वक्तव्य करत आहेत. या सरकारने नेहमीच जनतेला फसविण्याचे उद्योग केले. त्यांच्या भ्रष्ट आणि फसव्या कारभाराला जनता कंटाळली आहे. महाराष्ट्राला आता स्वाभिमानी नेते हवे असून, जनतेने विकासाची दृष्टी असणाऱ्या भाजपच्या हातात हे राज्य द्यावे.’ डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘ज्या यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली, त्या यशवंतरावांचा राजकीय घात करण्याचे काम येथील नेत्यांच्या घराण्याने केले. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांना पक्षातून संपविण्याचे कारस्थानही त्यांनीच केले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव मोहिते यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी या निवडणुकीत या मंडळींना जनतेने धडा शिकवावा.’ सभेला भारतीय जनता पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना व विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)अजितदादा.. आता तुमची बारी !राजधानी एक्स्प्रेसला महाराष्ट्राचा डबा जोडा : रुडीभगव्या रंगाची राजधानी एक्स्प्रेस ही जलद गतीने धावणारी रेल्वे आहे. भाजपाची घोडदौडही त्याच गतीने सुरू असून, भाजपाने आत्तापर्यंत राजस्थान, गोवा, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांत सत्ता मिळवित या राजधानी एक्स्प्रेसला डबे जोडले आहेत. आता या गाडीला महाराष्ट्राचाही डबा जोडा आणि देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला गती द्या,’ असे आवाहन खासदार राजीवप्रताप रुडी यांनी केले.