शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे वर्तन गांधी विचारांच्या विरोधात!

By admin | Updated: October 13, 2014 00:43 IST

बुलडाण्याच्या सभेत राहुल गांधी यांची घणाघाती टिका.

बुलडाणा : महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे, न्युयॉर्कमधील पुतळ्याप्रमाणे सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात या थोर नेत्यांच्या विचारांच्या विसंगत कृती करायची, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण असल्याची घणाघाती टिका काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी रविवारी बुलडाण्यातील जाहीर सभेत केली. बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिराच्या प्रांगणात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. सभेला उपस्थित जनसमुदायास मराठीत ह्यनमस्कारह्ण करून, भाषणाला प्रारंभ करणार्‍या राहुल गांधी यांनी भाजपवर सडेतोड टीका केली. महात्मा गांधी, सरदार पटेल यांनी लोककल्याणाचा विचार दिला. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. नरेंद्र मोदी हे लोकांसमोर महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांना आदर्श मानतात; मात्र प्रत्यक्षात या दोघांच्या विचारांची हत्या करणारी कृती करतात. गांधी, पटेलांच्या त्याच विचारधारेवर काँग्रेस पक्ष उभा राहीला आणि त्याच विचाराने सरकार चालविले. म्हणूनच काँग्रेसच्या सरकारमध्ये सामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू राहिला आहे. महाराष्ट्र ही शाहू, फुले, आंबेडकर यांची भूमी आहे. त्यांनी दिलेला विचार हा शाश्‍वत विचार असून, तोच काँग्रेसचा आत्मा आहे. त्यामुळे काँग्रेस संपविण्याची भाषा करणारे हा विचार संपविण्यास उद्युक्त करतात; मात्र हा विचार संपविण्याची ताकद मोदींमध्ये नाही, अशी टिका त्यांनी केली. काँग्रेसने जनसामान्यांना ६00 प्रकारची औषधं मोफत दिली, शस्त्रक्रिया मोफत केल्या. मोदी सरकारने मात्र अमेरिकी कंपन्यांशी हातमिळवणी करून, १0८ औषधांचे भाव वाढवले. ८ हजाराचे औषध १ लाख रूपयांचे केले. सोयाबिनचा भाव कमी केला. काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या मनरेगा, अन्न सुरक्षा, शिक्षण अधिकार, जमिन अधिग्रहण अशा चांगल्या योजना आता बंद करण्याचे षडयंत्र रचले जात असून, सामान्यांच्या खिशात जाणारा पैसा आता उद्योगपती आणि कंत्राटदारांच्या खिशात जात असल्याची टिका त्यांनी केली. *कहाँ गये अच्छे दिन?आमचे सरकार आल्यानंतर ह्यअच्छे दिनह्ण येतील, चिन घाबरेल, पाकीस्तान शरण येईल, अशा वल्गना भाजपने केल्या होत्या. प्रत्यक्षात चिनच्या राष्ट्रपतींसोबत मोदी झोपाळयावर झोके घेत होते, तेव्हा लद्दाखमध्ये चिनचे सैन्य घुसले. सीमेवर पाकीस्तानचा गोळीबार सुरूच आहे. अशा परिस्थितीत अच्छे दिन कब आयेंगे या प्रश्नावर, जल्द ही सब ठिक हो जायेंगा हे भाजपचे उत्तर असल्याचे, राहुल गांधी म्हणाले.