शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी, या चार प्रश्नांची उत्तरं शिक्षकांना मिळतील काय ?

By admin | Updated: September 3, 2014 03:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त सर्व शाळकरी विद्याथ्र्याशी एकाचवेळी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त सर्व शाळकरी विद्याथ्र्याशी एकाचवेळी संवाद साधणार आहेत. त्यासाठी विद्याथ्र्याना शाळेत हजर ठेवण्याबाबतच्या मुद्दय़ावर स्वागत आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दलच्या शिक्षकांच्या भावनांचे प्रातिनिधिक रूप ठरू शकेल, असे शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे पंतप्रधानांना लिहिलेले हे खुले पत्र. याची प्रत त्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडे सुपुर्द केली आहे. 
 
सन्माननीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी,
सप्रेम नमस्काऱ
येत्या दि. 5 सप्टेंबर 2क्14 रोजी, शिक्षकदिनी देशाला उद्देशून आपण भाषण करणार आहात. शिक्षकदिनी पंतप्रधानांनी असं भाषण करणं, हे पहिल्यांदाच घडत आहे. हा सुखद धक्का आहे, शिक्षकांसाठी सन्मान आहे. म्हणून त्याबद्दल आपलं मन:पूर्वक अभिनंदन आणि या निर्णयाचं स्वागत!
सगळा देश आपला संदेश ऐकण्यासाठी उत्सुक आहे. पण हे भाषण विद्याथ्र्याना ऐकवण्याची सक्ती करणारा फतवा केंद्र सरकारने काढला आहे, हे वाचून मन खट्ट झालं. सक्तीची काय गरज आहे? आणि वेळही दुपारी 3 ते 4.45 ची, अडचणीची.
आदेशात टीव्ही संचही उसनवारीने आणण्याचे फर्मान आहे. प्रत्येक वर्गात इतके टीव्ही संच आणायचे कुठून? उसनवारीने पैसे तर द्यावेच लागतील. महाराष्ट्रात वेतनेतर अनुदान 1क् वर्षात मिळालं नाही, मोठा बॅकलॉग आहे. मोडकळलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठीही पैसे नाहीत. महागडं वीजबिल भरतानाही नाकीनऊ येताहेत. इंटरनेटची व्यवस्था करायला सांगितली आहे. देशातल्या अध्र्या अधिक खेडय़ांमध्ये वीज असते कुठे? तर इंटरनेट कुठून येणार? आपल्या गुजरातमध्येच छोटे उदेपूर जिल्हय़ातल्या सजनपूर गावच्या मुलांचा फोटो अलीकडेच प्रसिद्ध झाला होता. नदीच्या पल्याड आदिवासी पाडय़ातल्या 125 मुलामुलींना शाळेसाठी नदी पोहून जावं लागतं. त्यांच्यासाठी नदीवर साकव किंवा पूलही अजून झालेला नाही, ना होडीची सोय आहे. त्या मुलांना तुमचं भाषण ऐकण्यासाठी टीव्ही केबलची जोडणी बहुधा नक्की होईल. निवडणुकीसाठी मतदार यंत्रे गाढवांवरून घेऊन जावी लागतात अनेक खेडय़ांत. 6 सप्टेंबरला टीव्ही संचही बहुधा असे गाढवांवरून  वाहून नेताना फोटो प्रसिद्ध होतील. 5 सप्टेंबरला देशात मोठाच इव्हेंट असणार आहे. उत्सुकताही मोठी आहे.
पण चार प्रश्न आहेत प्रधानमंत्रीजी,
1आपले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत नव्या सरकारचं बजेट मांडलं. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी भाषणात स्पष्ट सांगून टाकलं, की शिक्षणावर आता आणखी खर्च करण्याची गरज नाही. एक रुपया सुद्धा त्यांनी वाढवून दिलेला नाही. शिक्षणावरचा खर्चच वाढवायचा नाही, तर शिक्षण सर्वत्र पोचणार कसं? वाढणार कसं? तुम्ही असं का करताय? हे 5 सप्टेंबरला समजून घ्यायला आवडेल.
2याचा अर्थ शिक्षणाचं खाजगीकरण आणखी वाढत जाणार, हे उघड आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणातून आणि व्यापारीकरणातून महागलेल्या शिक्षणाच्या संधी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाहीत. मध्यमवर्गीयांना उच्च शिक्षण परवडत नाही. डॉक्टर, इंजिनीअर व्हायला 1क् ते 4क् लाख रुपये लागतात; आणणार 
कुठून? गरिबांच्या मुलांना स्वप्नही पाहता येत नाही. आपल्या 
भाषणातून आपण याबद्दल काही सांगणार का? ऐकायला देश उत्सुक आहे.
3शिक्षकांच्या कंत्रटीकरणातून शिक्षण क्षेत्रत शिक्षकांचं शोषण सुरू आहे. महाराष्ट्रात शिक्षणसेवक (आता टीचर ऑन प्रोबेशन) म्हणत होते. तिथे गुजरातमध्ये विद्यासहायक म्हणतात. गुजरातमध्ये त्यांचा पगार आहे फक्त रुपये 2,5क्क्/-. हायकोर्टाच्या भाषेत याला वेठबिगारी म्हणतात. या सरकारी शोषणाला एनडीएच्याच काळात सुरुवात झाली. पहिला प्रयोग गुजरातमध्येच झाला. या शोषणाच्या समाप्तीची घोषणा आपल्या भाषणातून होईल का? ऐकायला देशातील शिक्षक उत्सुक आहेत.
4गुजरातमध्ये दीनानाथ बात्रंचा नवा प्रयोग सुरू झाला आहे. या ‘महान’ शिक्षणतज्ज्ञाला शिक्षणातल्या आधुनिक मूल्यांच्या पुरस्काराने समाजाचा :हास होतोय असं वाटतंय. त्यांनी थेट अठराव्या शतकातल्या समाजमूल्यांचा पुरस्कार करणारी पुस्तकं तयार केली आहेत. शिकागोच्या धर्म परिषदेत सर्वाना ‘माङया बंधू-भगिनींनो, अशी आपुलकीच्या नात्याची हाक घालणा:या स्वामी विवेकानंद यांच्या नावावर भलत्याच कथा त्यांनी तयार केल्या आहेत. डॉ. राधाकृष्णन यांच्याही कधीही कुणीही न वाचलेल्या (ना त्यांनी सांगितलेल्या) संस्कार कथा त्यात आहेत. जात, धर्म, रंग, भाषा भेदाचं विषारी जहर शाळेतच संस्कारीत करणा:या या बात्र प्रयोगाबद्दल देशाच्या मा.प्रधानमंत्र्यांचं काय म्हणणं आहे? ऐकायला देश आतुर आहे.
माननीय प्रधानमंत्रीजी, विक्रमादित्यला वेताळाने विचारलेले हे प्रश्न नाहीत. खेडय़ापाडय़ात अडचणींच्या डोंगरद:या पार करीत उद्याच्या पिढय़ा घडवणारे आपले शिक्षक खूपच साधे आहेत. तुमच्या भाषणाचं फर्मान पोचलंय त्यांच्याकडे. तुमचं भाषण आपल्या मुलांना ऐकवण्याच्या तयारीला लागले आहेत. प्रश्न विचारायला त्यांना वेळ आहेच कुठे? जनगणनेपासून गुरंढोरं मोजण्यार्पयत सगळीच काम करावी लागतात त्यांना. त्यात आता टीव्ही, केबल, डिश अँटेना आणण्याचं काम. दोन दिवस त्यात जाणार आहेत. काही हरकत नाही. पण शिक्षकदिनी आपली आठवण होते आहे, यावर ते खूश आहेत. या न विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली तर ते भलतेच खूश होतील, प्रधानमंत्रीजी.
कळावे. लोभ असावा. धन्यवाद!
 
आला स्नेहांकित,
- कपिल पाटील