ऑनलाइन टीम
गांधीनगर, दि.१६ - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याचे स्पष्ट झाल्यावर नरेंद्र मोदींनी शुक्रवारी दुपारी आईची भेट घेतली. आत्तापर्यंत जिंकलेल्या प्रत्येक निवडणुकीनंतर मोदींनी आपला विजय आईच्या चरणी अर्पण केला असून यावेळीही ते आईला विसरले नाहीत.
गांधीनगरमधील मोदींच्या घराबाहेर मोदींच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. सुरक्षारक्षकांच्या कडक पहा-यात व समर्थकांच्या गराड्यात मोदी आले, त्यांनी आईची भेट घेतली, तिचे आशीर्वाद घेतले व तिला विजय अर्पण केला.