शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी...गडी बोलायला हुश्शार; म्हणे, मी त्यांना राजकारणात आणले!

By admin | Updated: January 6, 2017 04:42 IST

मोदी..गडी बोलायला फार हुशार... म्हणे, पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं. ऐकून म्हटलं मेलो आपण! भाषण असं ठोकून देतोय की, समोरच्याला वाटतं नक्कीच छाती ५६ इंचाची आहे

नाशिक : मोदी..गडी बोलायला फार हुशार... म्हणे, पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं. ऐकून म्हटलं मेलो आपण! भाषण असं ठोकून देतोय की, समोरच्याला वाटतं नक्कीच छाती ५६ इंचाची आहे, असे चिमटे काढत राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या शैलीत टीका केली.पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना पवार यांनी मोदी सरकारला जोरदार चिमटे काढले. ते म्हणाले, नोटाबंदीची घोषणा करताना ‘पचास दिन मुझे दे दो’ असं मोदी म्हणाले होते. पन्नास दिवस उलटून गेले तरी

जनतेचे हाल संपलेले नाहीत. आता ह्यांना कोणत्या चौकात उभं करायचं? कोणता आसूड हाती घ्यायचा? चाबूक घ्यायचा की वेताची छडी घ्यायची? शिवसेनेचे लोक त्यांचे सहकारी आहेत. काल उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. म्हटलं बाबा तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणारे लोक आहात. तुम्हीच ठरवा काय ते!

संसदेजवळच्या बँकेत २४ हजार रुपये काढायला माणूस पाठवला तर १० हजारच मिळाले. तेव्हा आमच्या सारख्या खासदारांची ही गत असेल तर चलनटंचाईने तुम्हाला किती मनस्ताप झाला असेल हे समजण्यासारखे आहे, असे सांगून पवार म्हणाले, सरकारची पुढची पायरी सोनं आहे. आमच्या आई-बहिणींच्या गळ्यात किती सोनं आहे याची चौकशी करणार आहेत. म्हणजे आम्ही लोकसभेचे अखेरचे सभासद ठरलो... पुन्हा कधी लोक आम्हाला संसदेत पाठवणार नाहीत. आमचीच अशी दैना झाली म्हणजे काय करायचं? कुणी बोलायचं? पवारांच्या या गुगलीवर एकच हशा पिकला. नोटबंदीवर आज जनता गप्प असली तरी ती मतपेटीतून व्यक्त होईल. काँग्रेस सरकारने आणीबाणीचा घेतलेला निर्णय असाच अंगलट आला होता. पुढे भुईसपाट व्हावे लागले, ही आठवणही पवार यांनी करून दिली.