शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनास देणार आधुनिक लूक

By admin | Updated: October 24, 2016 04:53 IST

साहित्य संमेलननगरीस पारंपरिक लूकऐवजी मॉडर्न लूक देणार, अशी माहिती कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती

डोंबिवली : साहित्य संमेलननगरीस पारंपरिक लूकऐवजी मॉडर्न लूक देणार, अशी माहिती कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी झाले. उद्घाटन प्रसंगी साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी, शुक्राचार्य गायकवाड,प्राचार्य अशोक महाजन, डॉ. दिनेश म्हात्रे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश देशपांडे, चंद्रकांत माने, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे उपस्थित होते. कार्यालयाचे उद्घाटन डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते झाले. उद््घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते होणार होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. मात्र, देवळेकर नाराज असल्याने ते आले नसल्याची चर्चा उद्घाटन प्रसंगी सुरू होती. धबडे यांनी सांगितले की, संमेलनाच्या ठिकाणी एक साहित्यिक टॉवर उभा करण्याचे विचाराधीन आहे. तसेच ज्येष्ठ साहित्यिक पु.भा. भावे, शं.ना. नवरे यांचे शिल्प तयार करण्यात येणार आहे. या विविध कल्पना आता कागदावर आहेत. त्या प्रत्यक्षात उतरवण्याचे विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले की, कार्यालय स्मार्ट आहे. त्यामुळे संंमेलनही स्मार्ट होणार, यात दुमत नाही. संमेलनाची टॅगलाइन ‘स्मार्ट साहित्य संमेलन’ अशी असावी. त्याचा विचार व्हावा. तसेच निवास व निधीचा आढावा घेण्यात यावा, अशी सूचना केली. आयोजकांनी निधी गोळा करण्यासाठी स्वत:लाच एक डेडलाइन आखून घ्यावी. संमेलनात साहित्यिकांचा मिलाफ घडवून आणावा. हे संमेलन साहित्यप्रेमींचे असावे, जेणेकरून शंभरावे साहित्य संमेलन पुन्हा डोंबिवलीत घेतले जावे, अशी अपेक्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली. प्राचार्य महाजन यांनी सांगितले की, शहरात लहानमोठी ३५ महाविद्यालये आहेत. या तरुणाईला संमेलनाकडे वळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. साहित्यिक गायकवाड यांनी संमेलनाच्या व्यासपीठावर बहुजनांना स्थान मिळावे, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. मसापचे देशपांडे यांनी सांगितले की, सध्या सगळीकडे डोंबिवलीत साहित्य संमेलनाचा फिव्हर आहे. त्याचा फायदा संमेलनाच्या यशस्वितेसाठी नक्कीच होईल. संमेलनासाठी सगळ्यांनी एकत्रित येण्याचे आवाहन वझे यांनी केले. (प्रतिनिधी)