शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेलिंगच्या अमिषाने दोन तरुणींचे शोषण

By admin | Updated: July 1, 2016 03:46 IST

लैंगिक शोषण करुन पैसे उकळल्याची तक्रार एका अल्पवयीन मुलीसह दोघींनी केल्यानंतर तुळींज पोलिसांनी एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली

वसई : फेसबुकवर मॉडेलिंगचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करुन पैसे उकळल्याची तक्रार एका अल्पवयीन मुलीसह दोघींनी केल्यानंतर तुळींज पोलिसांनी एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. चौकशीमध्ये त्याने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. रिंकू यादव (२५) असे तरुणाचे नाव असून तो नालासोपारा येथील संतोष भुवन येथे राहणारा बेरोजगार आहे. त्याचा सिनेसृष्टीशी कोणताही संबंध नाही. रिंकूने फेसबुकवर एक बनावट खाते उघडले होते. त्याने सिने सृष्टीत काम करण्याची अथवा मॉडेलिंगची आवड असणाऱ्यां युवतींना संपर्क साधण्याचे आवाहन करून स्वत:चा मोबाईल नंबर दिला होता. तसेच काही मुलींची बनावट खाती उघडून त्यात रिंकूमुळे आपणाला मॉडेलिंंग आणि चित्रपटात कामे मिळाल्याची माहिती दिली होती. त्याला भुलून नालासोपाऱ्यातील दोन मुली त्याच्या जाळ्यात फसल्या होत्या. या दोघींनी बुधवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात रिंकू विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. यातील एक मुलगी अल्पवयीन आहे. अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)रिंकूने आपणाला फोटोशूट करण्याच्या बहाण्याने कळंब येथील एका रिसॉर्टमध्ये नेले. त्याठिकाणी आपले अश्लिल फोटो काढण्यात आले. त्यानंतर रिंकूने ते फोटो सोशल नेटवर्कींग साईटवर टाकून बदनामी करीन अशी धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी मारण्याची धमकी देऊन आपणा कडून ५० हजार रुपये उकळल्याची फिर्याद एका १९ वर्षीय तरुणीने दिली आहे. >फोटो शूटच्या बहाण्याने ओढले जाळ्यातरिंकूने फसवणूक करून बलात्कार केल्याची दुसरी एक तक्रार बुधवारी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिल्या नंतर रिंकू विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून यादववर पोक्सो (बाल लैंगिक शोषण विरोधीकायदा) नुसार ही कारवाई केली जाणार आहे. यादव कडून पोलिसांनी मुलींचे काढलेले अश्लिल फोटो जप्त केले आहेत. यादवच्या जाळ्यात अनेक मुली फसल्या असल्याचा संशय असून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.