शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता पथक भाजपा कार्यालयात

By admin | Updated: February 9, 2017 05:16 IST

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भाजपामागे आता आचारसंहिता अंमलबजावणी विभागाच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. आचारसंहिता कक्षाचे भरारी पथक बुधवारी वसंत स्मृती या कार्यालयात जाताच भाजपाच्या काही नेत्यांनी त्यांना विरोध केला. चौकशीचे लेखीपत्र नसल्याने पथकास विरोध केल्यानंतर अखेरीस अधिकाऱ्यांनी तशी नोंद केली आणि ते माघारी फिरले. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार यादीचा विषय गाजला. अनेकांनी तिकीट विक्री झाल्याचा आरोप केला. परंतु त्याचबरोबर भाजपा कार्यालयात उमेदवारांकडून दोन लाख रूपये गोळा केला जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची सारवासारव सुरू असताना भाजपाचे नेते गोपाळ पाटील यांनी तिकीटासाठी दहा लाख रूपये देऊनही उमेदवारी मिळत नसल्याचा आणखी एक व्हीडीओ व्हायरल झाल्या. त्याचे भाजपाने खंडन केले असले तरी त्यातून भाजपासाठी हा विषय डोकेदुखी ठरला आहे.भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी निवडणूक विभागाच्या आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथकाने मंगळवारी दुपारी चार वाजता अचानक धडक दिली. तेव्हा भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी रघुनाथ कुलकर्णी हे प्रभाग प्रभारींच्या बैठकीत मार्गदर्शन करत होते. भरारी पथकाचे प्रमुख शिवाजी काळे तसेच सुनील कदम, प्रमोद मांडवे तसेच दोन पोलीस कर्मचारी तसेच व्हीडीओग्राफर यांचे पथक दाखल होताच भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी तसेच आमदार अपूर्व हिरे यांनी पथकाला विरोध केला. पथकाने तिकीट विक्री प्रकरणात प्राथमिक माहिती घेण्यासाठी आल्याचे सांगितले. परंतु, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशीचे लेखी आदेश आहेत काय, अशी विचारणा करीत चौकशी पथकाला सहकार्य देण्यास असमर्थता दर्शवली.निवडणूक आयोगाच्या लेखी पत्राला पक्षाकडून लेखी उत्तर दिले जाईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर चौकशी पथकाचे अधिकारी आल्यापावली माघारी परतले. प्रकरणाची लेखी स्वरूपात पत्र देऊन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख शिवाजी काळे यांनी दिली. (प्रतिनिधी)