शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मॉकड्रीलने उडाली ठाणेकरांत घबराट

By admin | Updated: June 9, 2017 03:19 IST

अतिरेकी कारवाया तसेच कोणतीही एखादी अनुचित घटना घडल्यास स्थानिक पोलीस आणि फोर्स-१ या कमांडोंची कशी तयारी आहे?

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अतिरेकी कारवाया तसेच कोणतीही एखादी अनुचित घटना घडल्यास स्थानिक पोलीस आणि फोर्स-१ या कमांडोंची कशी तयारी आहे? त्यांचा प्रतिसाद किती वेळेत कशाप्रकारे मिळतो, याची चाचपणी घेण्यासाठी ठाण्यातील एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंत रंगीत तालीम (मॉकड्रील) घेतले. अर्थात, या मॉकड्रीलची काहीच माहिती नसल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र चांगलीच घबराट पसरली होती.जागतिक पातळीवर ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता ठाण्यातही अशी एखादी घटना घडलीच, तर पोलिसांच्या तयारीची चाचपणी मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी घेतली. भारतासह जगभरात ज्यू धर्मीयांच्या धार्मिकस्थळी बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रील घेण्यात आले. सिनेगॉगजवळ अतिरेक्यांसारखे काही लोक शिरले असून त्यांच्याजवळ शस्त्रेही आहेत, अशी माहिती फोर्स-१च्या कमांडोंना मिळाली. हीच माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून ठाणेनगर, नौपाडा, राबोडी आणि कळवा या स्थानिक पोलीस ठाण्यांनाही मिळाली. साधारण बुधवारी रात्री ११.३० वा. मिळालेल्या या माहितीच्या आधारे अवघ्या काही मिनिटांमध्येच फोर्स-१ चे २० ते २५ कमांडो तसेच स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण परिसराला वेढा दिला. सिनेगॉग आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. काय घडले? कशामुळे रस्ते बंद केले? याची काहीच कल्पना नसल्यामुळे सिव्हील हॉस्पिटल परिसरात गोळीबार झाल्याचे वृत्त शहरभर पसरले. काहींनी शहरात अतिरेकी आल्याच्याही बातम्या सोशल मीडियाद्वारे पसरवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत ‘मिशन सिनेगॉग’ सुरू झाले होते. अनेकांनी नेमके काय घडले, हे पाहण्यासाठी या ठिकाणी धाव घेतली. पण, पोलिसांनी आपली शस्त्रे रोखून अन्य मार्गांनी जाण्यास लोकांना सांगितले. गुरुवारी पहाटे २.३० वा.पर्यंत ही रंगीत तालीम सुरू होती. अखेर २.३० वा.च्या सुमारास या भागातून पोलिसांनीही चार सशस्त्र अतिरेक्यांना (बनावट) ताब्यात घेतले. त्यानंतर, ही मोहीम फत्ते झाली. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी आणि मुख्यालयाचे उपायुक्त मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम पार पडली. अर्थात, खोपट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, उथळसर, चरई, कोलबाड, कॅसल मिल, सिद्धेश्वर तलाव आदी परिसरांतील नागरिकांमध्ये मात्र रात्रभर घबराटीचे वातावरण होते.