कोल्हापूर : आजवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून टोलमुक्तीसाठी लढा देणा:या कोल्हापूरकरांनी बुधवारी आंदोलनाचा अनोखा फंडा वापरला़ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिस्ड कॉल आणि एसएमएस करून टोलमुक्तीचे गा:हाणो मांडल़े कोल्हापूरकरांच्या या नाद खुळ्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलची बॅटरी डिस्चार्ज झाली नाही तरच नवल़
कोल्हापुरातील रविवार पेठेत लागलेल्या एका अनोख्या बॅनरने अख्ख्या शहराचे आणि मीडियाचेही लक्ष वेधल़े ‘आपला एक एसएमएस कोल्हापूर टोलमुक्त करू शकतो’ असा फलक बिंदू चौकात लावण्यात आला होता़ त्याखाली मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोबाइल क्रमांकही देण्यात आला होता़ मग काय, दिसेल त्याने आपल्या मोबाईलवरून थेट मुख्यमंत्र्यांनाच रिंग दिली़ तर अनेकांनी एसएमएस पाठवून टोलमुक्त करण्याची मागणी केली़ मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही मोबाइल घेतला नाही़ मात्र दिवसभर येणा:या हजारो एसएमएसमुळे त्यांच्या मोबाइलची बॅटरी डिस्चार्ज झाली असावी़
खरेतर मुख्यमंत्री आज दिवसभर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत होत़े त्यामुळे काही काळ त्यांचा मोबाइल बंदच होता़ ‘लोकमत’नेही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्या वेळी मोबाइल स्विच ऑफ असल्याचे आढळून आल़े (प्रतिनिधी)
या उपक्रमाबद्दल संयोजक महेश ढवळे म्हणाले, कोल्हापूरचा टोल हटविल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. या आंदोलनाचा हा एक टप्पा असून, यासाठी आम्ही या वेळी सोशल मीडियाचा वापर करीत आहोत. शहरातील विविध व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या उपक्रमाबाबत जनजागृती करणार आहोत. एक लाख एसएमएस तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहोत.