शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

माता आणि बाळाच्या संगोपनासाठी मोबाईल अ‍ॅप

By admin | Updated: January 2, 2017 21:43 IST

आरोग्य व्यवस्थेतही डिजिटल तंत्रज्ञानाची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 2 - ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेतही डिजिटल तंत्रज्ञानाची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. गरोदर माता आणि बाळाच्या संगोपनासाठी मोबाईल अ‍ॅप जिल्हा परिषद लाँच करणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नागपूर जिल्हा परिषदेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. संगोपन मोबाईल अ‍ॅप नावाने हा अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व आयसीटी मीडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त उपक्रमातून ही यंत्रणा जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्यासाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका कार्यरत आहे. गरोदर मातेपासून तर बाळाच्या जन्म झाल्यानंतर तो पाच वर्षांचा होईपर्यंत त्याची नोंद त्यांच्याकडे असते. परंतु एखादी महिला व बाळ जर गाव सोडून बाहेरगावी गेले असेल, अशावेळी आरोग्यसेविका काहीच करू शकत नाही. गरोदर मातेला तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला लावणारे, तसेच शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना वेळोवेळी लागणाऱ्या लसीकरणासाठी माहिती व मदत संगोपन अ‍ॅप करणार आहे. संगोपन अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर माता व बाळाची संपूर्ण माहिती त्यात भरावयाची आहे. ही माहिती अ‍ॅपमध्ये नोंदविल्यानंतर गरोदर मातांना प्रसूतीच्या दरम्यानपर्यंत घ्यावी लागणारी काळजी, आवश्यक लसीकरण तसेच बाळाला सुद्धा त्याच्या जन्मानंतर व पाच वर्षापर्यंत प्रत्येक वर्षात करविण्यात येणारे लसीकरणाची माहिती वेळेत देणार आहे. एकप्रकारे हा अ‍ॅप माता आणि बाळाच्या आरोग्यासंदर्भात आठवण करून देणार आहे.