शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविण्याच्या अफवेतून जमावाने एकाला ठेचून मारले

By admin | Updated: March 6, 2015 00:08 IST

मुलांचे अपहरण करणारा असल्याच्या संशयावरून जमावाने एका मनोरुग्णाला बेदम मारहाण करीत ठार मारले, तर त्याआधी मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरीही ठार झाला.

कन्नड तालुक्यातील खळबळजनक घटना : मनोरुग्णाच्या हल्ल्यात शेतकरीही ठार; पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने नातेवाईक बचावलेहतनूर (जि. औरंगाबाद) : मुलांचे अपहरण करणारा असल्याच्या संशयावरून जमावाने एका मनोरुग्णाला बेदम मारहाण करीत ठार मारले, तर त्याआधी मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरीही ठार झाला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास कन्नड तालुक्यातील टापरगाव- रुईखेडा शिवारात घडली. दत्तात्रय सखाराम पल्हाळ (३५, रा. बोडखा, ता. खुलताबाद) असे मनोरुग्णाचे आणि प्रकाश दौलतराव जंगले (५०, रा. टापरगाव, कन्नड) असे शेतकऱ्याचे नाव आहे. मनोरुग्णाला सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही जमावाने मारहाण केली. वेळीच पोलीस पोहोचल्याने त्यांचे जीव बचावले, हे विशेष. जंगलेंचा घाटीत मृत्यूमनोरुग्ण दत्तात्रय पल्हाळने डोक्यात लाकडी दांडा मारल्याने प्रकाश जंगले हेही गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जंगले यांचाही मृत्यू झाला. बहीण, मेव्हण्यालाही मारहाणमनोरुग्ण दत्तात्रय बेपत्ता झाल्यानंतर त्याची बहीण हिराबाई आडुळे, रामदास काटकर, मधुकर आडुळे, इस्माईल पटेल आदी दहा ते पंधरा नातेवाईक, मित्रमंडळी शोध घेत घेत अखेर टापरगावात पोहोचले. त्याचवेळी जमाव दत्तात्रयला मुले पळविणारा अपहरणकर्ता असल्याच्या संशयावरून मारहाण करीत होता. आपल्याच दत्तात्रयला मारहाण होत असल्याचे नजरेस पडताच या नातेवाईक, मित्रमंडळींनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही मंडळीही अपहरणकर्त्यांच्या टोळीचेच सदस्य असल्याच्या संशयावरून जमावाने त्यांनाही मारहाण सुरू केली.