शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला खिंडार, तीन माजी आमदार भाजपामध्ये

By admin | Updated: January 13, 2015 15:13 IST

मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तिघांनीही मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ -  विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर मनसेला आता गळती लागली आहे. मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तिघांनीही मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. तर मनसेचे नेते अखिलेश चौबेही मनसेला राम राम करत भाजपामध्ये दाखल झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रवीण दरेकर आणि वसंत गीते या दोघांनी मनसेच्या पदांचा राजीनामा दिला होता. तर कल्याण ग्रामीणमधील माजी आमदार रमेश पाटील हेदेखील नाराज असल्याचे वृत्त होते.  मनसेतील या नाराज नेत्यांची मध्यंतरी डोंबिवलीत गुप्त बैठकही पार पडली होती. या बैठकीमध्ये तिघांनी पुढील राजकीय वाटचालीवर चर्चा केल्याचे वृत्त होते. 

मंगळवारी दुपारी प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तिघांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या तिघांनीही कोणतेही पद मागितलेले नसून ते कार्यकर्ते म्हणूनच पक्षात आले आहेत असे दानवे यांनी स्पष्ट केले. गीते यांच्या प्रवेशामुळे नाशिक महापालिकेतील सत्तेचे समीकरण बदलणार का असा प्रश्न विचारला असता राजकारणात काहीच अशक्य नाही असे सूचक उत्तरही दानवे यांनी दिले. रमेश पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे कल्याण - डोंबिवलीत मनसेला धक्का बसू शकतो. आगामी महापालिका निवडणुकीत या तिन्ही नेत्यांमुळे भाजपाला फायदा होईल असे दिसते. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.