शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनसे तटस्थ राहणार !

By admin | Updated: December 12, 2015 02:15 IST

विधान परिषदेच्या मुंबईतील दोन जागांच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबईतील दोन जागांच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक तटस्थ राहणार असल्याचे शुक्रवारी मनसेने जाहीर केले. त्यामुळे मनसेच्या २८ सदस्यांच्या पाठिंब्याच्या आशेवर असणाऱ्या भाजपाचे गणित बिघडले आहे. तर, काँग्रेसच्या भाई जगतापांचा मार्ग सुकर झाला आहे. विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यात मुंबई महापालिकेच्या दोन जागा आहेत. शिवसेनेतर्फे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, काँग्रेसतर्फे आमदार भाई जगताप, भाजपातर्फे नगरसेवक मनोज कोटक यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, राष्ट्रवादीच्या प्रसाद लाड यांनी पक्षाचा राजीनामा देत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबई महापालिकेत एकूण २२७ नगरसेवक असून शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ ७५ पेक्षा जास्त असल्याने रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर, दुस-या जागेसाठी भाजपाचे मनोज कोटक, काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेसकडे ५२ नगरसेवक आहेत तर भाजपाकडे ३२. दोन्ही पक्षांना मनसे व समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)