शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे नेते प्रवीण दरेकर भाजपाच्या वाटेवर ?

By admin | Updated: October 24, 2014 12:29 IST

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे माजी आमदार प्रवीण दरेकर भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.

 

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ -  विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे माजी आमदार प्रवीण दरेकर भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. दरेकर यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची भेट घेतली असून येत्या काही दिवसांत त्यांच्या भाजपा प्रवेशाची घोषणा होईल असे सांगितले जाते. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय दरेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास मनसेला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत. 
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली असून यंदा पक्षाचा फक्त एक आमदार विधानसभेत पोहोचला आहे. पक्षाच्या या कामगिरीमुळे पक्षाची मान्यताच धोक्यात आली आहे. यंदा पक्षाचे धोरण चुकले असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले असले तरी मनसेचे धोरण नव्हे तर आमदार कमी पडले अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली होती. यामुळे नाराज झालेले प्रवीण दरेकर यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या धोरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता व त्यामुळे पराभव झाला असे दरेकर यांचे मत होते. दरेकर यांनी राज ठाकरे यांची तुलना थेट राहुल गांधीशी केली. प्रत्येक पराभवानंतरही काँग्रेसमध्ये राहुल गांधींची पाठराखण करणे सुरुच होते. मनसेतही राज ठाकरेंच्या निर्णयपद्धती आणि कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी आहे. मात्र आता पराभवासाठी आमदार आणि पदाधिका-यांना जबाबदार धरण्यात येत आहे अशी भावनाही दरेकर यांनी राजीनामा देताना व्यक्त केली. 
राजीनामा दिल्यावर प्रवीण दरेकर भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दरेकर येत्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये जातील असे यात म्हटले आहे. मात्र मनसेच्या एका नेत्याने दरेकर यांच्या भाजपाप्रवेशाचे कारण वेगळेच असल्याचे म्हटले आहे. दरेकर गेल्या २० वर्षांपासून राज ठाकरेंसोबत आहे. पण आता मुंबै बँकेतील घोटाळ्यामुळे ते मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये जात असावेत असे सूचक विधान या नेत्याने केले आहे.  माजी आमदार प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे संचालक असून या बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.