शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा स्वतंत्र गट स्थापन

By admin | Updated: November 6, 2015 02:21 IST

केडीएमसीत सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असतानाच, मनसेने गुरुवारी कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामध्ये

डोंबिवली : केडीएमसीत सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असतानाच, मनसेने गुरुवारी कोकण आयुक्तांकडे स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामध्ये त्यांच्या ९ नगरसेवकांसह १ अपक्ष (पुरस्कृत) आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. हा १० जणांचा गट आपल्याकडे खेचून आणण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केल्याने शिवसेनेत धाकधूक निर्माण झाली आहे.शिवसेनेचे ५२ नगरसेवक असून, त्यांनी केलेली जमवाजमव लक्षात घेता, सत्ता स्थापनेसाठी त्यांना ६/७ मतांची आवश्यकता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपाकडे ४२ नगरसेवक असून, त्यांना मनसे व एक अपक्ष अशा १० जणांची रसद लाभली, तर भाजपाचे संख्याबळ शिवसेनेच्या बरोबर येईल. त्यामुळे महापौरपद मिळवण्याची संधी शिवसेनेइतकीच भाजपाला उपलब्ध होते. अशा परिस्थितीत २७ गावांतील संघर्ष समितीचे सहा नगरसेवक व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य यांनाही शिवसेनेबरोबरच भाजपाचा पर्याय खुला होतो. राज्यातील सत्तेत भाजपा हा मुख्य पक्ष असून, गृह, नगरविकास अशी सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असल्याने, अशा स्थितीत भाजपाचा महापौर सत्तारूढ होऊ शकतो. त्यामुळेच मनसेला एक गट म्हणून नोंदणी करण्यास भाग पाडून फोडाफोडीची संधी मिळणार नाही, याची तजवीज भाजपाने केल्याचे बोलले जात आहे. मनसेने मात्र ते कोणासोबत आहेत, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय, हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. शिवसेनाही मनसेला सोबत घेण्याची थेट भूमिका जाहीर करीत नाही. शिवसेनेतील काही नेत्यांचा राज ठाकरे यांना किंगमेकर करण्यास तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत भाजपासोबत जाण्याचा मार्ग राज यांच्याकरिता खुला राहतो. विरोधी बाकावर मनसे बसणार नसल्याचे सांगत, त्या पक्षातील सूत्रांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. अनधिकृत बांधकामांच्या यादीत या पक्षाच्या एका नगरसेवकाचे नाव असल्याने त्याच्या डोक्यावर टांगती तलवार असल्याने तो तिढाही सुटता सुटेनासा झाला आहे. भाजपाच्या वळचणीला जाण्याचा निर्णय घेणे पक्षाच्या पथ्यावर पडेल, असे पक्षाच्या नेत्यांना वाटते.- ‘मनसे हा स्वतंत्र पक्ष असल्याने त्याची वेगळी गटनोंदणी करावीच लागते, हे नियमानुसार केलेले आहे. त्यामुळे गुरुवारी ९ +१ (अपक्ष) अशा १० जणांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे गट स्थापन केला, त्यात काही विशेष नाही,’ असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.