शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई: घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूलाच्या वादात आता मनसेची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 18:11 IST

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूलाच्या नामकरणावरून भाजपा खासदार मनोज कोटक व शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यात कलगीतुरा रंगला असताना या वादात आता मनसेने उडी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई:मुंबई शहरात अत्यंत दाटवस्ती असलेल्या मानखुर्द परिसरातून पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबई पुणे हायवे यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या रस्त्यामुळे या परिसरातील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.

घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरु होणाऱ्या मोठ्या उड्डाणपूलाच्या नामकरणावरून भाजपा खासदार मनोज कोटक व शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यात कलगीतुरा रंगला असताना या वादात आता मनसेने उडी घेतली आहे.मनसेचे घाटकोपर पश्चिम येथील विभागअध्यक्ष गणेश चुक्कल यांनी सदर उड्डाणपुलाला ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ असं नामकरण करून धनगर समाजाचा मान आणि सन्मान राखावा ही विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

सदर पूलाला "छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल" असे करण्याची खासदार मनोज कोटक यांनी महापालिकेतील स्थापत्य समिती उपनगरे अध्यक्ष यांजकडे लेखी पत्राद्वारे दि.9 डिसेंबर 2020 रोजी मागणी केली होती. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला 'सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोहिनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी' यांचे नाव देण्याची  मागणी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दि.10 जून 2021 रोजी केली आहे. या संदर्भात लोकमत ऑनलाईनवर काल वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमतचे वृत्त सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात व्हायरल झाले , तर खासदार मनोज कोटक यांनी सुद्धा 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेतली होती.

गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, मानखुर्द-शिवाजीनगर आणि गोवंडी या भागातून हा उड्डाणपूल जात आहे. या परिसरात धनगर समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचसोबत धनगर समाजाचे दैवत असलेली बिरोबा आणि मायक्का देवी मंदिर याच ठिकाणी आहे. त्यामुळे सदर उड्डाणपुलाला ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ असं नामकरण करून धनगर समाजाचा मान आणि सन्मान राखावा अशी विनंती त्यांनी शेवटी केली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईGhatkoparघाटकोपर