शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

FB वरुन मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा कार्यकर्त्यांची हाणामारी

By admin | Updated: March 26, 2017 21:39 IST

फेसबुक पेजवर लाईक आणि कमेंट करण्यावरुन झालेल्या वादामधून नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा नगरसेविकेच्या पतीसह कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 26 :  फेसबुक पेजवर लाईक आणि कमेंट करण्यावरुन झालेल्या वादामधून नगरसेवक वसंत मोरे आणि भाजपा नगरसेविकेच्या पतीसह कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुखसागर नगरमध्ये घडली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजुने फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. मनसे नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे (वय 43, रा. कृष्णलिला निवास, कात्रज) यांच्या फिर्यादीवरुन रवी एकनाथ संकपाळ (वय 44, रा. आनंदनगर सोसायटी, सुखसागरनगर), राजाभाऊ कदम, राहूल कामठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाभाऊ कदम यांच्या पत्नी भाजपाच्या नगरसेविका आहेत. तर रवी संकपाळ यांच्या फिर्यादीवरुन वसंत मोरे यांच्यासह बंडू सुर्यवंशी आणि मंगेश रासकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे आणि त्यांचे मित्र सुर्यवंशी व रासकर हे सुखसागरनगर येथून जात होते. त्यावेळी त्यांनी संकपाळ यांना ह्यतु विनाकारण माझ्या फेसबुकवर कमेंट का करीत असतोसह्ण अशी विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या संकपाळ, कदम आणि कामठे यांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सुर्यवंशी व रासकर यांनाही मारहाण करुन मोरे यांच्या हातातील महागडे घड्याळ तोडून नुकसान केल्याचे मोरे यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

तर, संकपाळ हे सुखसागरनगर येथील सिध्दी विनायक रुग्णालयामधून हेल्थ चेकअप करुन बाहेर आले होते. बुटाची लेस बांधत असताना मोरे व त्यांचे सहकारी तेथे गेले. मोरे यांनी संकपाळ यांना तु फेसबुकवर का लाईक करतोस, कमेंट का करतोस, तुझी लायकी नाही अशी विचारणा केली. त्यावर, ह्यतो माझा प्रश्न असून तुम्ही कोण विचारणारह्ण असे संकपाळ यांनी म्हणताच त्यांना तिघांनी मिळून हाताने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.