वाडा : तालुक्यातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार दि.१ रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदारांना एका निवेदनाव्दारे दिला आहे.वाडा तालुका अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. वाडा शहरात देखील मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. येथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. संपूर्ण वाडा शहराला गढूळ (अशुध्द) पाणी पुरवठा होत आहे, रस्त्यांची दुरावस्था, विजेची समस्या, डम्पिंग ग्राऊंडची समस्या, पार्र्किंगची समस्या, सार्वजनिक शौचालयांचा अभाव, अनधिकृत बांधकामे, अशा विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत त्यामुळे नागरीकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा तहसील कार्यालयासमोर सोमवार दि. १ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे सरचिटणीस देवेंद्र भानुशाली यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. त्याबाबत प्रशासनाची असलेली भूमिका मात्र कळू शकलेली नाही. (वार्ताहर)
मागण्यांसाठी आंदोलनाचा मनसेचा इशारा
By admin | Updated: July 31, 2016 03:06 IST