शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राणीबागेतील समस्यांवरून मनसे आक्रमक

By admin | Updated: May 9, 2017 01:46 IST

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील तिकीट दरवाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील तिकीट दरवाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथील नागरी समस्या सोडवण्याची मागणी करत मनसेने प्रस्तावित तिकीट दरवाढ रद्द करण्याचे आवाहन सोमवारी प्रशासनाला केले आहे.यासंदर्भात मनसेचे विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांची भेट घेतली. लिपारे म्हणाले की, राणीबागेतील प्रस्तावित तिकीट दरवाढ ही पेंग्विनचा देखभाल खर्च भागवण्यासाठी होत आहे. संपूर्ण राणीबागेतील पिंजऱ्यांमध्ये असलेल्या प्राण्यांची संख्या नगण्य आहे. मात्र तरीही पेंग्विनचा खर्च भागवण्यासाठी प्रशासनाकडून तिकीट दरवाढ करण्यात येणार आहे. त्याचा फटका वृक्षप्रेमींना बसणार आहे. राणीबागेत असलेल्या दुर्मीळ वृक्ष आणि रोपट्यांचा अभ्यास करण्यासाठी शेकडो वृक्षप्रेमी आणि विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यामुळे प्रस्तावित दरवाढ ही उद्यान पाहण्यासाठी लागू न करता केवळ पेंग्विनपुरती मर्यादित ठेवावी.नागरी समस्यांबाबत सांगताना लिपारे म्हणाले की, राणीबागेत पर्यटकांना मार्गदर्शन करणाऱ्या दिशादर्शक फलकांची संख्या वाढवावी. तसेच सर्व फलक योग्य ठिकाणी आणि ठळक अक्षरांत लावावेत. राणीबागेचे मुख्य प्रवेशद्वार दुपारी ३ वाजताच बंद करण्यात येत असल्याने पर्यटकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. परिणामी मुख्य प्रवेशद्वार सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची मागणी मनसेने केली आहे.