शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मनसैनिकांचा ठाण्यात हैदोस

By admin | Updated: January 21, 2017 04:33 IST

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी अक्षरश: हैदोस घालत ठाणेकरांच्या नाकीनऊ आणले.

ठाणे : नाशिकमधील विकासकामांच्या आधारे ठाण्यात मते मागणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी अक्षरश: हैदोस घालत ठाणेकरांच्या नाकीनऊ आणले. स्वागतासाठी पदाधिकाऱ्यांसह अनेक मनसैनिक दुचाकी आणि चारचाकीतून चेकनाका येथे आले होते. थोड्या वेळाने दुचाकीवरील मनसैनिकांना श्री माँ बालनिकेतन शाळेजवळ थांबण्यास सांगण्यात आले. तेव्हा जोरजोरात हॉर्न वाजवत दुचाकीवरून जात त्यांनी रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहतूककोंडी केली. काही जण बुलेटच्या सायलेन्सरमधून आवाज काढत स्टंट करत होते. बससमोर त्यांनी फटाके फोडले. त्यांना शाळेसमोर कचरा करून ध्वनिप्रदूषणात भर घालतोय, याचे भान उरले नव्हते. पिण्याच्या पाण्याचे ग्लास, प्लास्टीकच्या बाटल्याही त्यांनी रस्त्यातच टाकल्या. ग्लासेसचे खोकेही रस्त्यात फेकून दिले. एकेका दुचाकीवर तीन जण बसून जात होते. रस्त्यावरून जाताना किंकाळ्या फोडत, कर्कश हॉर्न वाजवत होते. कोपरीतून ठाणा कॉलेजसमोरील कार्यालयाजवळ तेथून सीकेपी फूड फेस्टिव्हलपर्यंत सर्व मार्गावर हा धुडगूस बराच काळ सुरू होता. (प्रतिनिधी)>‘आम्ही कार्यकर्ते नाही’ : आम्ही मनसेचे कार्यकर्ते नाही. आम्हाला बोलवले म्हणून आम्ही आलो. इथून कुठे जायचे याची माहिती आम्हाला नाही, अशी प्रतिक्रिया राज यांच्या स्वागताला आलेल्यांपैकी अनेक तरुण मंडळींची होती. योग्य वेळ आली की बोलेन - राज ठाकरेमी आता बोलणार नाही, योग्य वेळ आली की बोलेन, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. ठाण्यात पक्षाच्या १६ निवडणूक कार्यालयांच्या उद््घाटनासाठी ते आले होते. याच दौऱ्यात त्यांनी सीकेपी फूड फेस्टिव्हलला भेट दिली. तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आता काहीही बोलणार नाही, असे सांगितले. इथे खायला तोंड उघडायचे असते. बोलायला नाही. इथे सर्व जण पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे खवय्यांमध्ये मी लुडबुड करणार नाही, अशी कोपरखळी त्यांनी मारली. ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव व कार्यकर्त्यांनी राज यांचे स्वागत केले. या वेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अभिजित पानसे आदी उपस्थित होते. व्यासपीठावरून राज खाली उतरताच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास उपस्थितांनी गर्दी केली.