शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आमदार निवास प्रकरणाची सरकार, महिला आयोगाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 21:08 IST

आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर (वय १७) सलग चार दिवस झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने पोलीस प्रशासन आणि सामाजिक वर्तुळच

नरेश डोंगरे/ ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21 - आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर (वय १७) सलग चार दिवस झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने पोलीस प्रशासन आणि सामाजिक वर्तुळच नव्हे तर राजकीय वर्तुळालाही जबर हादरा बसला आहे.सरकारच्या गृह विभाग, सार्वजिक बांधकाम मंत्रालयासोबतच राज्य महिला आयोगाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वतंत्रपणे येथील शीर्षस्थ अधिकाऱ्यांकडे उशिरा रात्रीपर्यंत संपर्क करून प्रकरणाची इत्थंभूत माहिती घेतली. शुक्रवारी सकाळीच महिला आयोगाच्या सदस्यांची चमू पीडित मुलीच्या घरी पोहचणार आहे. उपराजधानीच्या वैभवात भर घालणारे आणि येथील अत्यंत संवेदनशील स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे आमदार निवास होय. विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी येथे राज्यातील आमदार, त्यांचे पाहुणे, कार्यकर्ते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची गर्दी होते. दोन ते तीन आठवड्यांचा हा कालावधी सोडल्यास येथे फारसे कुणी फिरकत नाही. स्थानिक विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा येथे मुक्काम असला तरी तो केवळ २० ते २५ टक्के खोल्यांमध्येच राहतो. अर्थात हिवाळी अधिवेशनाचा कालावधी सोडल्यास आमदार निवासाच्या ७५ टक्के खोल्या रिकाम्या असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे त्याची देखरेख करण्याची जबाबदारी आहे. अधिकारी या जबाबदारीकडे किती गांभीर्याने बघतात, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. येथे कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांसोबत दलालांची खास मैत्री आहे. या अभद्र मैत्रीने या संवेदनशील आणि वैभवी वास्तूला अय्याशीचे ठिकाण बनविले आहे. या भागात कुणी अधिकाऱ्याने अकस्मात चक्कर मारल्यास दारूच्या रिकाम्या बाटल्या, शरीरसंबंधानंतर फेकण्यात आलेले आक्षेपार्ह साहित्य, सिगारेटची पाकिटे सहज नजरेस पडतात. आमदार निवासाची रूम कुणाला द्यायची, त्यासंबंधीची काही नियमावली आहे. मात्र, अभद्र मैत्रीचे घटक असलेल्यांचे खिसे गरम केल्यास येथे कुणालाही सहजपणे रूम मिळते. त्याचमुळे दरदिवशी येथे अनाहुत पाहुण्यांची गर्दी होते. विशेष म्हणजे, बाहेरगावाहून नागपुरात बदलीवर आलेले अनेक अधिकारी शासकीय निवासस्थान, स्वतंत्र घर किंवा सदनिका भाड्याने घेण्याऐवजी आमदार निवासातच राहणे पसंत करतात. असे असतानादेखील रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्यादेखील येथे संशयास्पद मुली, तरुणी आणि महिलांचा वावर बघायला मिळतो. येथील खोली क्रमांक ३२० मध्ये अशाच प्रकारे पोहचलेल्या गिट्टीखदानमधील मुलीवर १३ एप्रिलची रात्र आणि त्यानंतरचे पुढचे तीन दिवस तीन रात्री सलग सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी घटना उघड होऊनही त्याची माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. नियंत्रण कक्ष, माहिती कक्षात माहिती देण्याचे टाळले. मात्र, या प्रकरणाची माहिती उघड होताच भडका उडावा तसा प्रकार घडला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी सायंकाळी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढून या प्रकरणाची माहिती घेत चौकशीचे आदेश दिले आहे. दुसरीकडे गृहमंत्रालयातूनही स्थानिक पोलिसांना विचारणा करण्यात आली आहे तर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गिट्टीखदानचे अधिकारी तसेच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी संपर्क करून या प्रकरणाची बारीकसारीक माहिती जाणून घेतली. दुसरीकडे महिला आयोगाच्या स्थानिक सदस्यांची चमू निता ठाकरे यांच्यासह गिट्टीखदान ठाण्यात पोहचली. त्यांनीही तेथील तपास अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. शुक्रवारी हे पथक पीडित मुलीच्या घरी जाऊन तिची भेट घेणार आहे. रहाटकरही एक दोन दिवसात नागपुरात येणार आहे.  कशी मिळते सहज खोली ?

विशेष म्हणजे, या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आरोपी अटक झाल्यानंतर आणि पोलिसांची पथके आमदार निवासात बुधवारी सकाळपासून चौकशी करण्यासाठी चकरा मारत असतानाच आमदार निवासाच्या खोली क्रमांक २०७ मध्येही बुधवारी दुपारी  भावनांचा भडका  उडाला. आपल्या घरच्या व्यक्तीसोबत भलतीच महिला दिसल्याचे हे प्रकरण होते. (त्याची तक्रार करण्याचे टळल्याने या प्रकरणावर पडदा पडला.) या दोन्ही प्रकरणातून कर्मचारी आणि दलालांच्या अभद्र मैत्रीचे काळे कारनामे उजेडात आले आहे. संबंध नसताना येथे कुणालाही सहजपणे खोली कशी उपलब्ध करून दिली जाते, असा प्रश्न त्यातून उपस्थित झाला आहे. ज्या माननीय आमदारांच्या निवासासाठी ही वास्तू आहे तेथे कुणीही भामटे पोहचतात, येथे ओल्या पार्ट्या होतात, काही जण येथे नियमित जुगार खेळण्यासाठीही जातात, ही चर्चा जुनीच आहे. मात्र, महिला-मुली आणून त्यांचे शोषण करण्यासाठी अथवा आमदार निवासाच्या खोल्यांचा वापर केला जातो, हा प्रकारच प्रचंड संतापजनक ठरला असून, या गैरकामासाठी कोण जबाबदार आहे, त्याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.  या प्रकरणाची माहिती ऐकून धक्का बसला. त्यामुळे रात्रीपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांकडूनही माहिती घेतली. पीडित मुलीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. विजया रहाटकरअध्यक्षा, राज्य महिला आयोग, मुंबई  आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने पोक्सो कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करणे सुरू आहे. आरोपींना आमदार निवासाची खोली कुणी उपलब्ध करून दिली, त्याचाही शोध घेतला जात आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिसांची संपूर्ण सुरक्षा आहे. डॉ. के. व्यंकटेशम पोलीस आयुक्त, नागपूर