शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार ठाकूर शिवसेनेच्या व्यासपीठावर

By admin | Updated: June 7, 2017 03:49 IST

अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : स्वत:ची कामगार संघटना असतानाही वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या बाजूने सरकारनेच नव्हे तर सर्व पक्षांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. असे आवाहन शिवसेनेच्या व्यासपीठावरून करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. बहुजन विकास आघाडीची स्वत:ची बहुजन कामगार संघटना आहे. वसई विरार महापालिकेसह वसई विरार आणि पालघर, बोईसर औद्योगिक वसाहतीत संघटना कार्यरत आहे. असे असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरार महापालिकेत शिरकाव करीत असलेल्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली. इतकेच नाही तर संघटनेच्या अग्निशमन दलातील फलकाचे अनावरणही केले. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडीक, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर, माजी नगरसेवक वसंत वैती, विनायक निकम यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यक्रमात भाषणही ठोकले. त्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. सध्या वसई विरार महापालिकेत माजी आमदार आणि अद्यापही शिवसेनेचे उपनेते असलेल्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने आपले बस्तान बसवले आहे. महापालिकेच्या महत्वाच्या विभागात पंडितांच्या संघटनेने शिरकाव केला आहे. पंडितांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी सतत आंदोलने करून महापालिकेला जेरीस आणले आहे. आमदार ठाकूर यांची स्वत:ची बहुजन कामगार संघटना असली तरी महापालिकेत या संघटनेला आपला जम बसवता आलेला नाही. याउलट पंडितांच्या संघटनेचे बळ वाढताना दिसत आहे. महापालिकेत पंडितांच्या संघटनेला शह देण्यासाठी आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेला महापालिकेत प्रवेश दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या महापालिका वर्तळात सुरु झाली आहे. महाडीक यांनीही महापालिकेतील इतर विभागातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीही भारतीय कामगार सेना पुढाकार घेईल, असे सांगितले. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर आमदार ठाकूर यांनी आपल्या तीन आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जाहिर पाठिंबा दिला होता. सध्या शिवसेना आणि भाजपमधील दरी वाढत चालली आहे. असे असताना आमदार ठाकूरांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली. तर सूर्यकांत महाडीक यांनी शेतकऱ्यांचा लढा चिघळल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. सरकारची जी चुकीचे धोरणे आहेत त्याला शिवसेनेचा विरोध राहणार आहे, असेही महाडीक यांनी सांगितले.