शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-खासदारांसाठी कोटा नको

By admin | Updated: June 27, 2016 05:41 IST

म्हाडाच्या घरासाठी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये आमदार-खासदारांसाठी राखीव असलेला कोटा त्वरित रद्द करून तो सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करावा

मुंबई : म्हाडाच्या घरासाठी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये आमदार-खासदारांसाठी राखीव असलेला कोटा त्वरित रद्द करून तो सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी लोकभारती पक्षाचे अध्यक्ष व आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी या आरक्षणाला विरोध दर्शवला आहे.म्हाडातर्फे यंदा मुंबईतील ९७२ सदनिकांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात आजी-माजी आमदार व खासदारांना मिळत असलेले वेतन व भत्ते हे दरमहा ४० हजारांहून अधिक असतानाही पूर्वीप्रमाणेच यंदाच्या लॉटरीतही अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील विविध ठिकाणची घरे त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. एकीकडे सर्वसाधारण गटात एका फ्लॅटसाठी दोन, अडीच हजार नागरिक इच्छुक असताना, वरील तीन उत्पन्न गटात एकही आजी-माजी आमदार अर्ज करू शकत नसल्याने, त्यांच्या कोट्यातील सदनिका सोडतीविना पडून राहणार आहेत. कपिल पाटील यांना वर्सोवा येथील राजयोग सोसायटीत आमदारांच्या कोट्यातून सदनिका वितरित करण्यात आली होती. मात्र, त्यांनी २३ मे २००९  रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहून ती रद्द केली होती. (प्रतिनिधी)

>सामान्य कोट्यातून अर्ज करा...

या धोरणाला आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही विरोध केला आहे. त्याला आ. कपिल पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे. आमदार-खासदारांसाठी कोटा ठेवू नये, त्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांचा रास्त दरात घरे उपलब्ध करून देण्याबाबत धोरण आखावे, आमदार-खासदारांनीही सर्व सामान्यांसाठीच्या कोट्यातून अर्ज करण्याची तरतूद आखावी, अशी मागणी त्यांनी पत्र पाठवून केली आहे.