शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदारांना ‘अंनिस’ विचारणार जाब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:25 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्टला ४ वर्षे पूर्ण होत असून अद्याप मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्टला ४ वर्षे पूर्ण होत असून अद्याप मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान ‘जवाब दो’ आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अंनिसचे शिष्टमंडळ प्रत्येक आमदार व खासदाराच्या घरी जाऊन यासंदर्भात जाब विचारणार आहे.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाटील म्हणाले की, शीना बोरा हत्याकांडाचा तपास अवघ्या काही महिन्यांत लागतो. मात्र सामाजिक कार्यकर्ते दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा उलगडा होण्यास अद्याप विलंब होत आहे. एकंदरीतच सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. याउलट दोन्ही हत्यांमध्ये संशयित आणि आरोपी म्हणून सनातन संस्थेचे साधक समोर आले आहेत. तरीही या संस्थेविरोधात बंदीची कारवाई करण्यात सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तत्काळ या हत्येचा तपास पूर्ण करून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभेत जाब विचारावा म्हणून अंनिसचे शिष्टमंडळ प्रत्येक आमदार व खासदाराची भेट घेणार आहे. आतापर्यंत संबंधित लोकप्रतिनिधीने दाभोलकर व पानसरे हत्याकांडासंदर्भात काय पावले उचलली, यासंदर्भातील विचारणाही शिष्टमंडळ करणार आहे. शिवाय आगामी काळात अधिक तीव्रतेने पाठपुरावा करून प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार अंनिसने केला आहे.बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखलदेशात जात पंचायतविरोधी, सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या कायद्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात सोमवारी पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती अंनिसने दिली. शिवाय मंगळवारी याच कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल होत असल्याचेही अंनिसने स्पष्ट केले. मुंबईतही सामाजिक बहिष्काराची अनेक प्रकरणे समोर येत असून लवकरच विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल, अशी माहिती अंनिसने दिली.