शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जयकुमार गोरेंना तीन दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: January 10, 2017 21:15 IST

महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 10 - महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाले. 
सुमारे दीड महिन्यापूर्वी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘आयटी अ‍ॅक्ट’चा गुन्हा दाखल झाला आहे. जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा दिवसांची मुदत त्यांना देण्यात आली. उच्च न्यायालयामध्ये दोनवेळा सुनावणीचे कामकाज होऊ शकले नाही. त्यानंतर तिस-या सुनावणीवेळी सोमवारी उच्च न्यायालयानेही आमदार गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आमदार गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु दुस-या दिवशी मंगळवारी सकाळी आमदार गोरे स्वत:हून शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. 
सुमारे तासभर त्यांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. या ठिकाणी त्यांची सुमारे दीड तास वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्यांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दुपारी सव्वा दोनला त्यांना जिल्हा न्यायालयात पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. सरकारी पक्ष आणि आमदार गोरे यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गोरे यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 
 
गोरेंचा चेहरा निर्विकार! 
आमदार जयकुमार गोरे न्यायालयात आल्यानंतर त्यांचा चेहरा गंभीर बनला. वकील न्यायालयापुढे म्हणणे मांडताना ते एकटक लावून ऐकत होते. सुमारे अर्ध्या तासानंतर न्यायाधीशांनी गोरेंना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देत असल्याचे जाहीर केले. यावेळी गोरे यांचा चेहरा निर्विकार दिसत होता. 
 
कार्यकर्त्यांची कसरत! 
जयकुमार गोरे हे सकाळी पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. त्यांना सिव्हिलमध्ये नेण्यात आले, त्यांच्यापाठोपाठ कार्यकर्त्यांच्याही गाड्या धावत होत्या. हीच परिस्थिती न्यायालयातही होती. त्यामुळे पोलिसांनी गोरे यांच्या चहू बाजूंनी कडे केले होते. तितकेच साध्या वेशातही पोलिस तैनात करण्यात आले होते. 
 
पोलिसांनी का मागितली कोठडी?
- ज्या मोबाईलवरून एसएमएस पाठविले, तो मोबाईल जप्त करायचा आहे. दोन मोबाईल असून, त्यातील सीमकार्ड जप्त करायचे आहे. हा सर्व तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी द्यावी. 
 
गोरे यांच्या वकिलांचे म्हणणे...
- आमदार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘रोज पोलिस ठाण्यात हजेरी हवी आहे का ?’ असे न्यायालयाने पोलिसांना विचारले होते. तेव्हा पोलिसांनी ‘काही गरज नाही. वाटेल तेव्हा फोनवरून बोलावून घेऊ,’ असे सांगितले होते. तपास आता उरलेला नाही. त्यामुळे पोलिस कोठडीची आवश्यकता वाटत नाही.