शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

या आमदारावर युवकाने केला जैविक वडील असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 05:42 IST

‘शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वेच माझे जैविक बाबा आहेत,’ असा आरोप करत, राज कोरडे या युवकाने मुंबईत राजकीय वर्तुळात भूकंप केला आहे.

मुंबई : ‘शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वेच माझे जैविक बाबा आहेत,’ असा आरोप करत, राज कोरडे या युवकाने मुंबईत राजकीय वर्तुळात भूकंप केला आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगत, स्ुर्वे यांच्या डीएनए टेस्टची मागणीही केली आहे.राजची आई आणि सुर्वे यांच्या कथित पत्नी उज्ज्वला यांनीही सुर्वेंविरोधात गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, १९८९ साली सुर्वे यांनी वजे्रश्वरी येथे लग्न केले. मात्र, दुसºया ठिकाणी लग्न ठरल्यावर माझी व मुलाची जबाबदारी नाकारली. मुलगा लहान असल्याने माझा विरोध तोकडा पडला. मात्र, आता तो मोठा झाल्याने, हक्कासाठी पुढे आले आहे. सुर्वे यांची मालमत्ता नको असून, केवळ त्यांचे नाव मुलाला देण्याची मागणी उज्ज्वला यांनी केली, तर राज याने सुर्वे यांच्या साथीदाराने बंदूक दाखवून धमकावले असून, डीएनए टेस्टसाठी आपले रक्त काढल्याचा आरोप केला. म्हणूनच उच्च न्यायालयात धाव घेत सुरक्षेसह सुर्वे यांच्या डीएनए टेस्टची मागणी केल्याचे त्याने स्पष्ट केले.सुर्वे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रतिक्रियेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपली राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचे स्पष्टीकरण सुर्वे यांनी दिले आहे. शिवाय खोटे आरोप करणाºयांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, सर्व आरोपांना तेथेच प्रत्युत्तर देत सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना