शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्य बनला आमदार

By admin | Updated: October 21, 2014 23:42 IST

इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो

दापोली : इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो. हे त्रिवार सत्य संजय कदम यांनी दाखवून दिले आहे. १९९० साली चिंचघर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते २०१४ ला दापोलीचे आमदार हा प्रवास एका सच्चा कार्यकर्त्याचा आहे. गेल्या २५ वर्षात त्यांनी ेराजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती जनतेने आज दिली आहे.तरुण वयात शिवसेनेत प्रवेश करुन ग्रामपंचायतीवर निवडून जात वयाच्या २१व्यावर्षी सरपंचपदाचा बहुमानही कदम यांनी मिळवला. सरपंच पदावरुन त्यांनी मागे कधीही वळून पाहिले नाही. खेड पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद गटनेता अशी त्यांची कारकीर्द राहिली. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपली छाप पाडली.दोन वर्षापूर्वी खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद नाकारल्याने शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करुन राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते, खेडचे तत्कालीन आमदार रामदास कदम यांच्या तालमीत वाढलेले संजय कदम कट्टर शिवसैनिक होते. राष्ट्रवादीत गेल्यावरसुद्धा सेनेचीच आक्रमकता त्यांच्या अंगात होती. सेना स्टाईलनेच त्यांनी जिल्हा परिषदेत अन्यायाविरोधात आवाज उठवला.दापोली विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत खेड तालुका दापोलीला जोडला गेला व २००९ साली सूर्यकांत दळवी यांच्यापाठीशी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ते ठाम राहिले. संजय कदम व सूर्यकांत दळवी यांची गुरु शिष्याची जोडी जमली. मात्र अडीच वर्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद खेडला मिळावे, असा आग्रह कदम यांनी धरला. मात्र खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद न देता दापोलीच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी दळवी यांना देण्यात आले व गुरु शिष्याचा दुरावा निर्माण झाला. संजय कदम यांनी राष्ट्रवादी जोडली व एकेकाळचे गुरु शिष्य पक्के राजकीय विरोधक बनले.दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सूर्यकांत दळवी १९९० साली आपले राजकीय गुरु तत्कालीन मंत्री बाबुराव बेलोसे यांचा पराभव करुन विजयी झाले. त्याच दळवींचा पराभव त्यांच्या एकेकाळच्या शिष्याने केल्याने या मतदारसंघातील ही परंपरा कायम राहिली आहे.दापोली विधानसभेतील मतदारांनी गोडबोले आमदाराला नाकारले असून निष्क्रीयतेला जनता कंटाळली आहे. जनतेला विकासकामे हवी आहेत. केवळ गोड बोलून जनतेचा विकास होणार नाही. मतदार सुज्ञ झाले आहेत. तुलनात्मकदृष्ट्या कोण उमेदवार असावा हे जनतेने दाखवून दिले आहे. २५ वर्षे आमदार असणाऱ्या व्यक्तीतालुक्याचा विकास केलेला नाही. जनतेला परिवर्तन हवे होते. म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवू. विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला करुन दाखवू.- संजय कदम, विद्यमान आमदार.