शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसंबंधास नकार दिल्याने मित्राच्या पत्नीचा खून

By admin | Updated: May 15, 2017 07:25 IST

मित्राच्या पत्नीने शरीरसंबंधास नकार दिल्याने तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नराधमाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मित्राच्या पत्नीने शरीरसंबंधास नकार दिल्याने तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नराधमाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. हितेश कर्तकपाडी (२३) असे त्याचे नाव असून श्वेता महेद्र तांडेल (२८, रा,सुंदरनगर, कुलाबा) हिचा त्याने बुधवारी निर्घृण खून केला होता. त्यानंतर अज्ञात लोकांनी घरात घुसून तिची हत्या केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, असे परिमंडळ एकचे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

महेंद्र तांडेल हा पत्नीसह सुंदरनगरात राहावयास असून त्याच्या घराच्या वरच्या खोलीत हितेश व अन्य दोघे जण राहत होते. चौघे जण सेल्समनचे काम करतात. बुधवारी महेंद्र व अन्य दोघे जण कामावर गेल्यानंतर हितेश तेथेच थांबला होता. त्याने श्वेता हिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र तिने नकार दिल्याने जबरदस्ती करू लागला असताना ती जमिनीवर पडल्याने डोक्याला मार लागला.

जखमी झाल्याने आपल्याविरुद्ध तक्रार करेल, या भीतीने हितेशने स्वयंपाक घराच्या खोलीत असलेल्या चाकूने तिचा गळा कापला. ती ठार झाल्यानंतर हितेश गुपचूपपणे कामाच्या ठिकाणी गेला. घरातून खाली उतरत असताना खोलीमध्ये काही लोक गेले होते, ते तिच्या परिचयाचे असतील म्हणून आपण विचारणा न करता कामाच्या ठिकाणी निघून गेलो, असे हितेशने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्याच्या जबाबातील विसंगती असल्याने ‘खाक्या’ दाखविल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त शर्मा यांनी सांगितले.