शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

मोबाईलच्या वादातून मित्राची हत्या

By admin | Updated: March 31, 2015 14:11 IST

फुटलेल्या मोबाईल स्क्रीनने दोन मित्रांमध्ये असा काही वाद वाढवला की एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली.

नागपूर : फुटलेल्या मोबाईल स्क्रीनने दोन मित्रांमध्ये असा काही वाद वाढवला की एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली. सोमवारी सकाळी आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली. धीरज लखन राणा (वय २५) असे मृताचे नाव असून, तो प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होता.मूळचा मुंबई (शिवशक्ती मित्र मंडळ, ए वन बेकरी-३, डोंगरी गोरेगाव वेस्ट) येथील रहिवासी असलेला धीरज जलविहार कॉलनीत राहुल नामक मित्रासोबत भाड्याने राहात होता. तेथेच आरोपी अभिषेककुमार देवेंद्र प्रसाद (१९, रा. बरोद, जि. बलिया, उत्तर प्रदेश) राहुलच्या ओळखीने काही दिवसांपूर्वी राहायला आला. अभिषेक एमआयडीसीतील पेस वूड कंपनीत रोजंदारीवर काम करायचा. रविवारी मोबाईल चार्जिंगला लावत असताना अभिषेकचा धक्का लागल्याने धीरजचा मोबाईल खाली पडला. मोबाईलचा स्क्रीन फुटल्यामुळे धीरज संतप्त झाला. त्याने मोबाईल दुरुस्त करून देण्यासाठी अभिषेकच्या मागे तगादा लावला. कंपनीतून कामाचे पैसे मिळाल्यानंतर पैसे देईल, असे अभिषेकने सांगितले. धीरज थांबायला तयार नव्हता. त्यामुळे त्याला घेऊन अभिषेक रविवारी रात्री १०.१५ च्या सुमारास पेस वूड कंपनीजवळ आला. कंपनीचे गेट बंद असल्यामुळे त्यांच्यात गेटसमोरच वाद झाला. ते वाद घालतच रस्त्याने निघाले. दोघेही ईरेला पेटले. त्यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली. अभिषेकने भाजी कापण्याचा चाकू सोबत आणला होता. धीरज मारहाण करीत असल्यामुळे त्याने धीरजच्या गळ्यावर चाकूने वार केले. तो खाली कोसळताच त्याचा मृतदेह आॅर्डनन्स फॅक्टरीजवळच्या नाल्यात फेकून रूमवर निघून आला.मध्यरात्री तो एकटाच आला आणि त्याची अवस्थाही चांगली नव्हती, त्यामुळे राहुलने त्याला काय झाले, धीरज कुठे आहे, अशी विचारणा केली. अभिषेकने त्याला झालेला प्रकार सांगितला. त्यामुळे राहुलने त्याला पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर त्याला सोमवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याजवळ नेऊन सोडले. (प्रतिनिधी)पोलिसांची धावपळआरोपीने प्रतापनगर ठाण्यात पोहोचून हत्या केल्याचे सांगताच पोलिसांची धावपळ उडाली. त्याने सांगितलेले घटनास्थळ एमआयडीसीत असल्याचा अंदाज बांधून प्रतापनगर पोलिसांनी एमआयडीसी ठाण्याला माहिती दिली. शोधाशोध केल्यानंतर धीरजचा मृतदेह जेथे आढळला तो नाला वाडी पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे वाडी पोलिसांना कळविण्यात आले. धीरजचा मृतदेह रुग्णालयात पाठविल्यानंतर पोलिसांनी आरोपी अभिषेकला अटक केली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, उपनिरीक्षक महादेव पडधान करीत आहेत.आई-वडिलांच्या स्वप्नाला तडेधीरजची कौटुंबिक स्थिती सर्वसाधारण आहे. त्याचे वडील मुंबईत एका कंपनीत काम करतात. एकुलता एक मुलगा हुशार असल्यामुळे त्यांनी पदरमोड करीत त्याला शिक्षणासाठी नागपुरात पाठविले. तो इंजिनीअर बनेल, त्याला नोकरी मिळाल्यानंतर सुखाचे दिवस येतील, असे स्वप्न धीरजचे आई-वडील रंगवीत होते. मात्र मोबाईलचे कारण झाले आणि धीरजचा जीव गेला.