शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप वादातून पुण्यात मित्रावर हल्ला

By admin | Updated: April 24, 2016 02:33 IST

बीबीएच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झालेल्या वादावादीमधून चौघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आबासाहेब गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी एकच्या

पुणे : बीबीएच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झालेल्या वादावादीमधून चौघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आबासाहेब गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थ्यांनीच बाहेरील गुंडांच्या मदतीने शस्त्रांस्त्रांसह घातलेल्या राड्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात चार विद्यार्थी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अनिरुद्ध भालेराव (वय २१), हर्षद चौगुले (वय २४), रोहन पेटकर (वय २४), शुभम गांगुर्डे (वय २१), सुमित बाटुंगे (वय २१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह शेखर वीर, शुभम सकट, अनिल तुपेरे, सुरज लोखंडे, अतुल जाधव, चिवड्या अशा २० ते २५ जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी दंगल आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. संकेत साळुंके (वय २०) याने फिर्याद दिली आहे. या घटनेत अक्षय दिनकर (वय २१) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके आणि आरोपी गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये बीबीएच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहेत. बीबीएच्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. साळुंके याचा गुरुवारी वाढदिवस होता. ग्रुपवर त्याला शुभेच्छा देत असताना आरोपी हर्षद चौगुले याने ग्रुपचे नाव बदलले. तेव्हा अक्षय दिनकर आणि हर्षद यांची ग्रुपवर वादावादी सुरु झाली. पेपर संपल्यानंतर अक्षय आणि साळुंके अन्य विद्यार्थ्यांसमवेत इमारतीच्या पार्किंगमध्ये आले. तेथे अनिरुद्ध भालेरावने अक्षयच्या कानाखाली मारली. सोबत आलेल्या गुंडांनीही त्याला मारहाण केली. मध्ये पडलेल्या साळुंके आणि अंकित झाडगे, विकास गिरे, मित्र समीर लाड यांना देखील जबर मारहाण करण्यात आली. आरोपींनी कोयत्यासारख्या हत्याराने तसेच टी आकाराच्या लोखंडी गजाने अक्षयच्या डोक्यात वार केले. तसेच सिमेंट ब्लॉकही डोक्यात घातले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्याच्या मित्रांनी अक्षयला जवळच्या खासगी रुग्णालयात हलवले. (प्रतिनिधी)