शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोणी धामणीच्या गारपीटग्रस्तांची ससेहोलपट पंचनाम्याची कागदपत्रे झाली गहाळ

By admin | Updated: May 8, 2014 22:56 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची शासनाने ससेहोलपट चालविली असून, नुकसान एकाचे व भरपाई मात्र भलत्यालाच, असा प्रकार झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे

लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची शासनाने ससेहोलपट चालविली असून, नुकसान एकाचे व भरपाई मात्र भलत्यालाच, असा प्रकार झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संतापजनक प्रकाराची व त्याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.लोणी धामणी परिसरात बहुतेक शेतकर्‍यांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतातील पिकाचे होत्याचे नव्हते झाले. काढणीला आलेली पिके हातातून गेली. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत. या पिकांचे पंचनामे महसूल विभागाने व कृषी विभागाने केले होते. परंतु, भरपाई मिळताना ज्याचे राजकीय वजन जास्त, ज्याची अधिकार्‍यांबरोबर ओळख जास्त, अशाच शेतकर्‍यांना भरभरून भरपाई मिळाली आहे. पण खरे नुकसानग्रस्त व गरीब शेतकरी मात्र या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले असल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संताप आहे. तर दुसरीकडे पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना उपसरपंच अनिल वाळुंज यांच्या प्रयत्नाने १३५ शेतकर्‍यांना दहा लाख रुपयांची मदत मिळाल्याने तेथील शेतकरी मात्र समाधानी व आनंदी आहेत. खडकवाडी, नाथनगर (ता. आंबेगाव) येथील २१८ शेतकर्‍यांना २५ लाख ६३ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचे येथील माजी उपसरपंच अनिल डोके यांनी सांगितले. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकर्‍याना मदत मिळत आहे, तर दुसरीकडे नुकसान होऊनही मदत मिळत नाही, हा कुठला कायदा? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत. या अधिकार्‍यांनी अशी चुकीची कामे केली असतील तर अशा दोन्ही अधिकार्‍यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी; अन्यथा शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा लोणी येथील शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष अशोक आदक पाटील यांनी दिली आहे.चौकट : नऊ महिने नऊ दिवस येथील शेतकरी बारकू लंके हे ग्रामविकास अधिकार्‍यांकडे नुकसानीची चौकशी करण्याकरिता गेले असता नुकसानभरपाई मिळण्याकरिता नऊ महिने नऊ दिवस भरावे लागतात, असे संतापजनक उत्तर मिळाल्याचे बारकू लंके यांनी डोळ्यांत अश्रू व भावनाविवश होऊन सांगितले.