शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील बेपत्ता मुली भोपाळला सापडल्या

By admin | Updated: June 26, 2016 00:04 IST

गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या तीन मुली भोपाळला सापडल्या. एकीच्या फेसबूक फ्रेण्डने त्यांना भोपाळला बोलवून लॉजमध्ये ठेवून घेतले होते, असे प्राथमिक तपासात उघड झाले. शांतीनगरच्या

पाच दिवसांपूर्वी बेपत्ता : फेसबूक फे्रण्डने ठेवले होते लॉजमध्ये

नागपूर : गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या तीन मुली भोपाळला सापडल्या. एकीच्या फेसबूक फ्रेण्डने त्यांना भोपाळला बोलवून लॉजमध्ये ठेवून घेतले होते, असे प्राथमिक तपासात उघड झाले. शांतीनगरच्या पोलीस पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेऊन नागपुरात आणले. शांतीनगरातील एका महिलेने २१ जूनला शांतीनगर पोलीस ठाण्यात त्यांची १६ वर्षीय मुलगी आणि १९ वर्षीय पुतणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी या दोघींचे मोबाईल लोकेशन तपासले असता त्या भोपाळला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस उपायुक्त एम. राजकुमार, सहायक आयुक्त चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सचिन धर्मेजवार, हवलदार उमा यादव , रमेश तायडे, नायक विजय दासरवार यांचे पथक भोपाळला रवाना झाले. त्यांनी भोपाळ पोलिसांशी संपर्क करून रेल्वे स्टेशन जवळच्या कपूर लॉजमध्ये या दोघी तसेच तहसीलमधील एक मुलगी अशा तिघींना ताब्यात घेतले. त्यांना तेथे बोलविणारे शूभम द्वारकाप्रसाद ठाकूर (वय १९) आणि धर्मेंद्र हरिप्रसाद रेकवार (वय २३, रा. भोपाळ) या दोघांनासुद्धा पोलिसांनी अटक केली. दहावीत नापास झाल्यामुळे...!यातील एक मुलगी भोपाळचा रहिवासी शूभम द्वारकाप्रसाद ठाकूर याची फेसबूक फ्रेण्ड होती. त्याच्यसोबत ती आॅनलाईन संपर्कात होती. दहावीत नापास झाल्याने ती अस्वस्थ झाली. तिने आपली मानसिक स्थिती शूभमला कळवली. शूभम आणि त्याचा मित्र धर्मेंद्र याच्याशी संगणमत करून तिला तिच्या मैत्रीणींसह भोपाळला बोलविले. तुमच्या खाण्याची, राहण्याची आणि नोकरी लागेपर्यंत शिक्षणाची व्यवस्था करण्याचेही आश्वासन दिले. त्यामुळे या तिघीही तेथे गेल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना अटक केली.