शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

सोनेखरेदीचा मुहूर्त आंदोलनामुळे चुकणार

By admin | Updated: April 7, 2016 00:58 IST

गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर सोने खेरदीचा मुहूर्त यंदा चुकणार आहे. अबकारी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या बंदवर सर्व सराफ संघटना ठाम असल्याने या दिवशी

पुणे : गुढीपाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर सोने खेरदीचा मुहूर्त यंदा चुकणार आहे. अबकारी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या बंदवर सर्व सराफ संघटना ठाम असल्याने या दिवशी सोन्या-चांदीची सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बंद सुरूच राहणार असल्याचे पुणे सराफ असोसिएशनने स्पष्ट केले आहे.मागील ३६ दिवसांपासून सराफ सुवर्णकारांचा देशभर संप सुरू आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या देशभरातील सराफ संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बंद सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदच्या काळात आजपर्यंत देशात १० तर महाराष्ट्रात ५ सुवर्णकारांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. सरकार कोणत्याच प्रकारे आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही. याअगोदर २०१२ साली हा कायदा युपीए सरकारने लागू केला होता. त्यावेळी भाजपाने विरोध केला. त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा लागला होता. आता हाच भाजपा तो कायदा उग्र स्वरूपात लागू करीत आहे. अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या सराफ सुवर्णकार व्यवसायाबद्दल सरकारला काही देणे-घेणे नाही. आम्ही नाईलाजाने हे पाऊल उचलले आहे. ग्राहकांनी आमच्या भावना समजून घेऊन सहकार्य करावे, असे पुणे सराफ असोसिएशनने पत्रकात म्हटले आहे. सराफ सुवर्णकार कोणताही कर भरण्यास तयार आहेत. किंबहूना १ टक्क्यापेक्षा १.५ टक्का कर इतर कोणत्याही मार्गाने भरण्यास तयार आहोत. परंतु हा जाचक कायदा लादून घेणार नाही. आयात केलेले सोने देशातील २६ बँकांनाच विकण्याची परवानगी आहे. मात्र सराफ सुवर्णकारांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी भुमिका असोसिएशनने मांडली आहे.