शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

क्षेपणास्त्र विनाशिका विशाखापट्टणमचे जलावतरण

By admin | Updated: April 21, 2015 01:10 IST

पाकिस्तान व चीनपासून देशाला असणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन विविध युद्धनौका आणि युद्धसामुग्रीचा नौदलामध्ये समावेश सुरु असल्याचे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. के. धवन

मुंबई : पाकिस्तान व चीनपासून देशाला असणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन विविध युद्धनौका आणि युद्धसामुग्रीचा नौदलामध्ये समावेश सुरु असल्याचे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. के. धवन यांनी सोमवारी स्पष्ट केले. स्वदेशी बनावटीच्या ‘विशाखापट्टणम’ या पहिल्या क्षेपणास्त्र विनाशिकेचे जलावतरण मुंबईतील माझगाव डॉक येथे नौदलप्रमुखांच्या पत्नी मीनू धवन यांच्या हस्ते करण्यात आले. विशाखापट्टणम विनाशिका २0१८ पर्यंत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. माझगाव डॉकमध्ये प्रकल्प १५ बी अंतर्गत चार क्षेपणास्त्र विनाशिका बांधण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या विनाशिकेचा जलावतरण सोहळा सोमवारी पार पडला. प्रत्येक युद्धनौका ७ हजार ३00 टन वजनाची असून १६३ मीटर लांबी आहे. चार गॅस टर्बाईन असणारी ही युद्धनौका जास्तीत जास्त ३0 नॉटिकल मैल धावू शकते. सर्व धोके लक्षात घेऊन आणि नवी आव्हाने पाहून आम्ही बहुउद्देशीय क्षमतावृद्धी योजना बनविल्याचे धवन यांनी सांगितले. सध्या विविध प्रकारच्या ४८ युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती सुरु आहे. स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढत असून २६ युद्धनौका आणि पाणबुड्या आपण स्वदेशी स्तरावर बनवून घेतल्याचे धवन म्हणाले. सध्या युद्धनौकांच्या बांधणीत ९0 टक्क्यांहून अधिक स्वदेशीकरण झाले असून त्याची अनेक उदाहरणे आहेत. विक्रांत विमानवाहू युद्धनौका आणि विशाखापट्टणम विनाशिकेत भारतातच बनलेले स्टील वापरण्यात आले आहे. आम्ही पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास कटिबद्ध असल्याचे धवन यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)